प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांच्या लांबलचक याद्या

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनियुक्त नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar mayor election
प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांच्या लांबलचक याद्याFile Photo
Published on
Updated on

Long lists of development projects for the ward submitted by the corporators

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनियुक्त नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी प्रत्येक नगरसेवक आयुक्तांना निवेदनाद्वारे विकास कामांच्या लांबलचक याद्या सादर करीत आहेत. मात्र आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात नगर सेवक-अधिकारी यांची प्रभातफेरी काढून त्यात दहा विकासकामांची यादी तयार करण्याचे नियोजन केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
Sambhajinagar News : मनपात सजली पदाधिकाऱ्यांची दालने

महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटले आहेत. अद्याप महापौरपदाची निवडणूक झालेली नाही. येत्या १० फेब्रुवारीला पहिली सभा होणार आहे. त्यात महापौर-उपमहापौरपदाची निवड होणार आहे. त्यानंतर स्थायी समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया होणार आहे.

या सर्व प्रक्रियेनंतरच महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे नियोजन होईल, अशी शक्यता आहे. अर्थसंकल्पात आपापल्या प्रभागातील जास्तीत जास्त विकासकामांचा समावेश व्हावा यासाठी प्रत्येक नगर-सेवकाने प्रशासनाकडे मागण्यांचा सपाटा लावला आहे. आपल्याच प्रभागातील कामाला प्राधान्य मिळावे यासाठी प्रत्येक नगरसेवक आग्रही असल्याने, प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
प्रचारासाठी जिल्हाभरात हेलिकॉप्टरचा धुरळा

यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी मॲक्शन प्लॅनफ तयार केला आहे. प्रभागातील चार नगरसेवक आणि मनपाचे अधिकारी यांनी प्रभागात फिरून टॉप १० समस्यांची यादी तयार करून त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news