Sambhajinagar News : मनपात सजली पदाधिकाऱ्यांची दालने

प्रशासनाकडून नगरसेवकांच्या स्वागताची जय्यत तयारी
sambhajinagar news
मनपात सजली पदाधिकाऱ्यांची दालनेfile photo
Published on
Updated on

sambhajinagar the administration has made elaborate preparations to welcome the corporators

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेडून नवनिर्वाचित नगसेवकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून, महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी यांच्या दालनासह सर्व साधारण सभेचे सभागृहही सजले आहे. त्यासोबतच मुख्यालयाच्या इमारतीचीही रंगरंगोटी केली जात आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

यंदा प्रथमच प्रभागनुसार महापालिकेची निवडणूक घेण्यात आली असून, तब्बल साडेपाच वर्षांनंतर शहराचा कारभार सांभाळण्यासाठी २९ प्रभागांतून ११५ कारभारी निवडून आले आहेत. या कारभारींमधूनच १० फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर निवडण्यात येणार आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाकडून नवीन पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय कार्यकाळ संपून नवीन पदाधिकारी व नगरसेवक शहराचा कारभार चालवणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, विषय समित्यांचे सभापती यांची दालने आणि सर्वसाधारण सभेचे सभागृहाचे चकचकीत करण्यात आले आहेत.

sambhajinagar news
Paid Leave for Voting : कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी

नवीन नगरसेवकांना मनपा मुख्यालयात प्रवेश करताच प्रसन्न वाटावे, त्यांना जनतेची कामे करताना उत्साह मिळावा यासाठी मुख्य इमारतीची रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे.

तसेच नगरसेवकांच्या वाहनांची व्यवस्था करण्यासाठी मुख्य इमारतीसह टप्पा-३ मधील इमारतीच्या परिसरात तयारी सुरू केली आहे. या सर्व कामावर आयुक्त जी. श्रीकांत हे बारकाईने लक्ष देत आहे. तसेच प्रशासनातील विभागप्रमुखांची दालनेही नवीन आणि सुशोभित करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news