

Life-threatening struggle faced daily education plight students
बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरातील वाघ वस्ती व पवार वस्तीला जोडल्या जाणाऱ्या ३ किलोमीटर रस्त्यासाठी ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
निधोना रस्ता परिसरातील वाघ व पवार शेत वस्तीवरील नागरिकांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. दोन्ही वस्ती मिळून ५० च्या जवळपास घरे असून २५० लोकसंख्या आहे. दीडशे शाळकरी मुलांना शिक्षणासाठी बाबरा गावात जाण्यासाठी रस्ताच नाही.
मुलांना शाळेत जाण्यासाठी चार ठिकाणी पूल नसलेले नाले ओलांडून जावे लागते. वस्तीवर एक वस्तीशाळा सुद्धा आहे. येथील नागरिकांचा व्यवसाय शेती सोबत जोडधंदा दुग्ध व्यवसायाचा असून नदी नाल्यांना पूर आल्यानंतर नाला ओलांडून जाता येत नसल्याने पन्नास ते शंभर लिटर दुध फेकल्याशिवाय दुग्ध व्यवसायिकांना काही पर्यायच उरत नाही.