FDA Action : वडगाव कोल्हाटी येथील हॉटेल योगराजचा परवाना रद्द

एफडीएची कारवाई, व्हेज नॉनव्हेज पदार्थ एकत्र, नोटीस देऊनही सुधारणा नाही
FDA Action
FDA Action : वडगाव कोल्हाटी येथील हॉटेल योगराजचा परवाना रद्दfile photo
Published on: 
Updated on: 

License of Hotel Yograj at Vadgaon Kolhati cancelled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुधारणा नोटीस देऊन ही अन्न सुरक्षिततेच्या नियमांतील त्रुटी दूर न करणाऱ्या वडगाव कोल्हाटी येथील हॉटेल योगराजवर एफडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या हॉटेलचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

FDA Action
Asaduddin Owaisi : एसआयआरच्या आड एनआरसीची तयारी

सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी २९ जुलै रोजी हॉटेलची तपासणी केली होती. त्यावेळी आढळलेल्या त्रुटींवर सुधारणा नोटीस बजावण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर हॉटेलची फेरतपासणी करण्यात आली.

मात्र, या तपासणीतही परिस्थिती फारशी बदललेली नसल्याचे समोर आले. हॉटेलच्या भिंती, छत आणि दरवाजांचे प्लास्टर व रंग उडालेला, खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसणे, तसेच ड्रेनेज लाईनमध्ये झुरळे व कीटक रोखण्यासाठी आवश्यक सापळे नसणे, अशा बाबी आढळल्या.

अन्न साठवणुकीच्या ठिकाणी कचरा वेळेवर हटवला जात नसल्याचेही निदर्शनास आले. निलंबन काळात हॉटेलमध्ये अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री अथवा वितरण करता येणार नाही आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशी कारवाई करण्यात येणार असून, हॉटेलव कडक पाळत ठेवण्याचे निर्देश संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती सहआयुक्त श्रीकांत करकले यांनी दिली.

FDA Action
Sambhajinagar News : १,३५४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र

या हॉटेलमध्ये तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवण्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आलेली नव्हती. त्याशिवाय आवश्यक कागदपत्रे व नोंदी जतन न केल्याचेही फेरतपासणीत आढळले.

आता थेट अन्नविक्रीवरच बंदी

सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी कायम राहिल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम ३२ आणि नियमन २.१.८ अंतर्गत परवाना निलंबित करण्यात आला. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news