Plot Sale Fraud : बॉण्डवर एकाच प्लॉटची तिघांना विक्री, १४ लाखांची फसवणूक

दोन भूमाफियांवर गुन्हा दाखल; चिकलठाणा परिसरातील प्रकार
Plot Sale Fraud
Plot Sale Fraud : बॉण्डवर एकाच प्लॉटची तिघांना विक्री, १४ लाखांची फसवणूकfile photo
Published on: 
Updated on: 

Sale of the same plot to three people via bond; ₹14 lakh fraud

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करून पोटाला चिमटा काढत पै-पै जमा करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या स्वप्नांवर भूमाफियांनी दरोडा टाकला आहे. चिकलठाणा भागात एकाच प्लॉटची चक्क दोन ते तीन जणांना १०० रुपयांच्या बॉण्डवर विक्री करून ७जणांची तब्बल १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध शनिवारी (दि.१०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Plot Sale Fraud
Municipal School : मनपाच्या जीर्ण शाळांना सीएसआरचा आधार, चार नव्या इमारतींचे नियोजन

रमजान अकबर शहा (३८) आणि अतीक मुतलब शेख (४५, दोघे रा. गल्ली नं. १ व २, मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण सत्यभान गायकवाड (३५, रा. संघर्शनगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, रमजान शहा याने २०१५ मध्ये चिकलठाणा येथील गट क्रमांक २९८ मध्ये २० गुंठे जमीन खरेदी केली होती. या व्यवहारात अतीक शेख हा साक्षीदार होता.

या जागेत रमजानने २० बाय ३० आकाराचे छोटे प्लॉट पाडून ते गरिबांना विकण्यास सुरुवात केली. जास्तीत जास्त पैसे लाटण्याच्या लालसेपोटी त्याने एकाच प्लॉटची (प्लॉट क्र. ०६) चक्क तीन वेगवेगळ्या मजुरांना विक्री केली. एवढ्यावरच न थांबता, गरिबांकडून पैसे उकळल्यानंतर आरोपींनी ती संपूर्ण २० गुंठे जमीन पुन्हा १५ ते १७ लाखांत दुसऱ्याच एका व्यक्तीला परस्पर विकून टाकल्याचेही तक्रारीत समोर आले आहे.

Plot Sale Fraud
Crime News : कुख्यात मुक्या साळवेचा गावठी कट्टा सांभाळणारा तरुण गजाआड

प्लॉटवर ताबा मिळत नसल्याने आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व कष्टकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांत धाव घेतली. गरिबांना गंडा घालणाऱ्या या भूमाफियांवर कठोर कारवाई करून पैसे परत मिळवून देण्याची मागणी पीडितांकडून केली जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सर्व नागरिक हे अत्यंत गरीब व कष्टकरी वर्गातील

या फसवणुकीचे बळी ठरलेले सर्व नागरिक हे अत्यंत गरीब व कष्टकरी वर्गातील आहेत. मुलांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि डोक्यावर स्वतःचे हक्काचे छप्पर असावे, या आशेने कोणी रोजंदारी मजुरी करून, कोणी केटरिंगचे काम करून, तर महिलांनी धुणी-भांडी करून अनेक वर्षांत ८० हजार ते १ लाखांची पुंजी गोळा केली होती. मात्र, आरोपींनी या मजुरांच्या गरिबीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत १०० रुपयांच्या नोटरीवर खोटे प्लॉट विकून त्यांच्या आयुष्याची कमाई हडप केली.

या कष्टकऱ्यांची झाली फसवणूक

त्रिशरण गायकवाड (केटरिंग व्यावसायिक): प्लॉट क्र. १६ साठी १ लाख रुपये.

वैजंती राऊत (घरकाम): प्लॉट क्र. ०६ साठी ८० हजार रुपये.

मीना भालेराव (घरकाम): प्लॉट क्र. ०६ साठी ८० हजार रुपये (एकाच प्लॉटची दुहेरी विक्री).

लहू जाधव (मजूर): प्लॉट क्र.

०६ साठी १ लाख रुपये (याच प्लॉटची तिहेरी विक्री).

भानुदास सुर्वे (मजूर): ६०० चौरस फूट जागेसाठी ६ लाख रुपये.

शेख रिजवाना (घरकाम): प्लॉट क्र. १३ व १४ साठी १ लाख ५० हजार रुपये.

खान मोबीन गुलाब गौसः प्लॉट क्र. १९ व २० साठी २ लाख ५० हजार रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news