Leopard Terror : शहरात बिबट्याची पुन्हा दहशत

गोगाबाबा टेकडी परिसरात धुमाकूळ; चार महिन्यांत तीन गाईंसह ३५ हून अधिक वासरांची केली शिकार; अहीर माळावरील शेतकरी, पशुपालक प्रचंड भयभीत
Leopard Terror
Leopard terror : शहरात बिबट्याची पुन्हा दहशतfile photo
Published on: 
Updated on: 

Leopard terror returns to the city

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोगाबाबा टेकडी परिसर, मौजे जटवाडा म्हणजेच अहीर माळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मागील काही महिन्यांपासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. या परिसरातील गोठ्यांमधील ३ दुभत्या गाईंसह ३५ हून अधिक वासरांना बिबट्याने आपले भक्ष्य बनवले आहे. रोज २ ते ३ वासरांची शिकार होत असल्याने येथील शेतकरी, पशुपालक हे अत्यंत हवालदिल आणि भयभीत झाले आहेत. वन विभागाला मंगळवारी निवेदन देत या बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी केली आहे.

Leopard Terror
Crime News : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेत, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

या परिसरात २० ते २५ गोठ्यांमध्ये गाई-म्हशींसह लहान-मोठी सुमारे १५०० हून अधिक जनावरे आहेत. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे बिबट्यांनी आपला मोर्चा या मुक्या जनावरांकडे वळवला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, या भागात एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या आणि त्याचे दोन बछडे वावरत आहेत. विशेष म्हणजे, पशुपालकांनी पत्रे आणि लाकडी फड्यांच्या आडोशाने सुरक्षित केलेले गोठे भेदून बिबट्या सर्रास वासरांवर झडप घालत आहे. रात्रीच्या सुमारास या भागात बिबट्यांचा मुक्त संचार असतो. रोज २ ते ३ वासरांना मारून त्यांच्या शरीरातील केवळ रक्त शोषून घेत असल्यामुळे तो 'रक्तपिपासू' बनला असल्याची भीती पशुपालकांनी व्यक्त केली आहे.

डोळ्यादेखत आपले पशुधनाचा नाहक जीव जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा बिबट्या माणसांवरही हल्ला करण्याच्या धोक्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सुमारे तीन वर्षांपूर्वी या भागात बिबट्या आढळला तेव्हा वन विभागाने त्याला जेरबंद न करता केवळ फटाके फोडून औपचारिकता पूर्ण केली होती. त्यामुळे बिबट्या पसार झाला होता. मात्र, मागील पाच महिन्यांपासून पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने येथील नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

Leopard Terror
Beed News : नांदूरघाटच्या सरपंच सुनीता जाधव अपात्र
पिंजरा लावणार, आवश्यक सर्व उपाययोजना गोगाबाबा टेकडी, जटवाडा परिसरात मादी बिबट्याचा वावर आहे. पथकाला तपासणीसाठी पाठवले होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. तिथे पिंजराही लावला जाईल. -
सुवर्णा माने, उपवनसंरक्षक, वन विभाग.

तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी

बिबट्यामुळे येथील शेतकरी व पशुपालक आणि त्यांचे पशुधनाला वाचवण्यासाठी वन विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे आणि पिंजरे लावून या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी विभागीय वन अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे गंगालाल सिद्ध, पारस अहीर, पवन जांगडे, भोला सिद्ध यांनी केली. कारवाई न केल्यास वन विभाग मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.