Leopard : चांदापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शेतातील गोठ्यात असलेल्या कुत्र्याची शिकार; वनविभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार
Leopard
Leopard : चांदापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळFile photo
Published on
Updated on

Leopard sighting in Chandapur area

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

सिल्लोड तालुक्यातील चांदापूर शिवारातील शेतकरी शेख ताहेर शेख महेबूब यांच्या गट नंबर ५८ मधील शेतातील गोठ्यावर असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सदर कुत्र्याचा मृतदेह हा सुमारे २०० मीटर अंतरावरील हरिसिंग राजपूत यांच्या विहिरीजवळील नाल्यामध्ये आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीती पसरली आहे. परिसरात ट्रॅप कॅमरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leopard
Sambhajinagar Municipal election : भाजपसह दोन्ही शिवसेना स्वबळाच्या वाटेवर

माहिती दिली की, चांदापूर सह मंगरूळ, पालोद, चिंचपूर शिवारामध्ये मागील काही महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक वेळा शेतकर्याना बिबट्याचे दर्शन झाले आहे. वन विभागाने पिंजरा लावला परंतु वन विभागाने केवळ औपचारिकताच पार पाडली.

मागील महिनाभरापासून चांदापूर मंगरूळ, पालोद आणि चिंचपूर शिवारातील शेतवस्त्यावरील कित्येक कुत्रे ही गायब झाली. या कुत्र्यांच्या बिबट्यानेच फरशा पाडल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. मागील महिना भरापूर्वी चांदापूर शिवारातील गट नंबर ७० मध्ये शेतकरी भास्कर पालोदे यांच्या नजरेत देखील बिबट्या पडला होता.

Leopard
Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानात येणार सिंहाची जोडी

वन विभागाने कोणती कारवाई केलेली नाही. या घटनेमुळेशेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा परिसरामध्ये ट्रेकिंग कॅमेरे आणि पिंजऱ्या लावून देखरेख करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतवस्तीवरील अनेक कुत्रे गायब

शेतवस्तीवरील जनावरांसह शेतमालाचे वन्यप्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी चांदापूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी कुत्रे पाळले आहेत. मात्र, गत दोन ते तीन महिन्यात शेतवस्तीवरील अनेक कुत्रे अचानक गायब झाले आहेत. हित्र वन्यप्राण्यांनी हल्ला करून ठार केल्याचे शेतकऱ्यांना निदर्शनात आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ट्रॅकिंग कॅमेरे बसवा नसता मोर्चा

वन विभागाने चांदापूर शिव-ारातील शेत वस्तीवर ट्रॅकिंग कॅमेरा लावून बिबट्याचा बंदोबस्त केला तातडीने करावा नसता शेतकऱ्यांच्या वतीने हातात रुमणे घेऊन जनावरांसह वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अॅड. शेख उस्मान यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला निवेदनाव्दारे दिला आहे.

पिंजरे लावणे अशक्य

बिबट्या हा प्राणी एकाच ठिकाणी कायम राहत नाही. फार आवश्यकता भासल्यास पिंजरे लावले जातात. वनविभागाकडून शक्यतो जंगलात ट्रेकिंग कॅमेरे बसविले जातात परंतु सिव्हिल एरियामध्ये ट्रेकिंग कॅमेरे बसवता येत नसल्याने वन विभागाची अडचण आहे. असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपक यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news