Leopard News : वारेगावात बिबट्याचे पिल्ले आढळल्याने खळबळ

वनविभागाकडून नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा
Leopard News
Leopard News : वारेगावात बिबट्याचे पिल्ले आढळल्याने खळबळfile photo
Published on
Updated on

Leopard cubs found in Waregaon, causing a stir

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वारेगाव येथे उसाच्या फडात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आल्याने परिसरात शुक्रवारी (दि.आठ) मोठी खळबळ उडाली. ऊसतोडणी सुरू असताना ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांसह ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leopard News
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वारेगाव येथील शेतकरी प्रदीप तेजराव जाधव यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. मजूर ऊस तोडत असताना अचानक उसामधून हालचाल झाल्याने त्यांनी पाहणी केली असता एक बिबट्याचे पिल्लू दिसून आले. त्यामुळे काही काळासाठी कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात आणखी एक पिल्लू आढळल्याने भीती आणखीनच वाढली. घटनेची माहिती मिळताच सरपंच रत्नप्रभा संदीप बोरसे, सागर ठेंगे, प्रदीप जाधव यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करत उसाच्या फडात शोधमोहीम सुरू केली. मादी बिबट्या आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने विशेष खबरदारी घेतली. दिवसभर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते.

Leopard News
रानमांजराची दोन पिल्ले आढळली

शेतात जातांना खबरदारी घ्या

परिसरात बिबट्या वावर आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास एक पिल्ल अचानक उसाच्या फडात पळून गेल्याची माहिती समोर आली. तर दुसरे पिल्ल सुरक्षित राहावे यासाठी त्याला त्याच ठिकाणी कॅरेट खाली झाकून ठेवण्यात आले आहे. मादी विवट्या रात्रीच्या वेळी परत येऊन पिल्लाला घेऊन जाईल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news