Lemon Tree Hotel Assault |'लेमन ट्री' हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण

'लेमन ट्री' हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील 'लेमन ट्री' हॉटेलमध्ये नियमांचे उल्लंघन करत हुज्जत घालणाऱ्या आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या नऊ जणांच्या टोळक्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.२८) रात्री घडली. राहुल सुभाष हिंगे (रा. नवनाथनगर, गारखेडा), दिनेश यशवंत घावत (रा. बदलापूर, ठाणे), प्रदीप बाबूसिंग राजपूत (रा. टीव्हीसेंटर, जाधववाडी), दत्ता सुभाष हिंगे (रा. नवनाथनगर, गारखेडा), राजीव नारायण कोलते (रा. नवनाथनगर, गारखेडा), सगपान विलास नरवडे (रा. नवनाथनगर, जवाहर कॉलनी), योगेश धनसिंग दुल्हत (रा. मयूर पार्क, संयोगनगर), विशाल पंडित खाडे (रा. आदित्यनगर, पिसादेवी) आणि राजकुमार जैना अशी आरोपींची नावे आहेत.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar- भूमाफियांनी तोतया महिला उभी करून कोट्यवधींचा प्लॉट हडपला

हॉटेलचे सिक्युरिटी मॅनेजर सौरभविजय काटकर (३३) यांच्या तक्रारीनुसार, विशाल खाडे, ललित राठोड आणि योगेश दुल्हत यांच्या नावाने हॉटेलमधील रूम नंबर १३२ बुक करण्यात आली होती. रविवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास विशाल आणि योगेश हे त्यांच्यासोबत आणखी १० ते १२ जणांना घेऊन हॉटेलवर आले.

नियमानुसार एका रूममध्ये तीनपेक्षा जास्त जणांना थांबता येणार नाही, असे हॉटेल प्रशासनाने सांगितल्यानंतर या टोळक्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सिक्युरिटी मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह शेफ यांनी या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली. ११२ वर कॉल करून घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर आरोपींनी पुन्हा ऑनलाईन एक रूम बुक केली. त्यानंतर पुन्हा वाद घालून हा जमाव एचआर मॅनेजर रखी गंगावणे यांच्या अंगावर धावून गेला.

Crime News
University Admission Trends | विद्यापीठातील नऊ अभ्यासक्रमांना एकही अर्ज नाही

गाडी चोरीचा आरोप

या टोळक्याने हॉटेलवर गाडी चोरीचा खोटा आरोप करत सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला आणि दादागिरी सुरू केली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही दाखवण्याच्या कारणावरून हॉटेलचे कर्मचारी विशाल म्हस्के आणि सुरक्षारक्षक अनिल फुके यांना बेदम मारहाण केली. तपास हवालदार बी. एस. जगताप करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news