स्वीकृत नगरसेवकासाठी नेत्यांची मुले, बहीण-भाऊ रिंगणात

८० इच्छुकांनी दाखल केले अर्ज, एमआयएम ३, भाजपचे १३, तर दोन्ही सेनेचे प्रत्येकी १५ इच्छुक
Chhatrapati Sambhajinagar
स्वीकृत नगरसेवकासाठी नेत्यांची मुले, बहीण-भाऊ रिंगणातFile Photo
Published on
Updated on

Leaders' Children and Siblings Enter the Fray for Nominated Corporator Seats

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी नेत्यांच्या मुलांसह भाऊ-बहिणींनी फिल्डिंग लावली आहे. दहा जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यात या सर्वांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या १३, एमआयएमच्या ३ इच्छुकांसह शिंदेसेनेचे १५ आणि ठाकरे सेनेचे १५ जणांचा समावेश आहे. आता १ एप्रिल रोजी या अर्जाची छाननी होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar
महापालिका स्वीकृत सदस्यांसाठी पावणेदोनशेवर अर्ज

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ११५ पैकी सर्वाधिक ५६ नगरसेवक हे भाजपचे विजयी झाले आहेत. त्यानंतर एमआयएमचे ३३, शिवसेनेचे १३, शिवसेना उबाठाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार १० स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.

संख्याबळानुसार भाजपला ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहेत. एमआयएम या पक्षाला तीन स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहेत. त्यानुसार एमआयएमने तीन जणांची नावे जाहीर केली असून, त्यांनीच सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदेसे-नेसह ठाकरे सेनेला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे. मात्र या एका जागेसाठी दोन्ही सेनेकडून प्रत्येकी १५ असे ३० इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. तर भाजपकडून ५ जागांसाठी १३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Jalna Municipal Corporation politics : जालना मनपातील स्वीकृत सदस्यांवरून राजकारण रंगले

नेत्यांच्या मुलांचा समावेश

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांची बहीण तथा भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला किसनराव कराड, तसेच मुलगा तथा भाजपचे सरचिटणीस हर्षवर्धन भागवत कराड यांचा समावेश आहे. आमदार संजय केणेकर यांचे पुत्र हर्षवर्धन संजय केणेकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. ठाकरे सेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांचाही अर्ज आहे.

माजी नगरसेवकांचाही समावेश

कमलाकर जगताप, गोपाळ कुलकर्णी, आशा बिनवडे, रूपचंद वाघमारे, पुनमचंद बमने, चेतन कांबळे, गोकुळसिंग मलके यांचा समावेश आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news