Ashadhi Ekadashi : हजारो हातांनी बांधले लाडक्या पांडुरंगासाठी लाडू

एक लाख गूळ-शेंगदाणा लाडू बनविण्याचा सेवा उपक्रम
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi : हजारो हातांनी बांधले लाडक्या पांडुरंगासाठी लाडूfile photo
Published on
Updated on

Laddus made by thousands of hands for beloved Pandurang

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वारकरी सेवा फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (दि.१९) सकाळी दहा ते पाच या वेळेत पाटीदार भवन, जालना रोड येथे उपवासाचे एक लाख गूळ-शेंगदाणा लाडू बनविण्याचा सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Wari | श्री संत गजानन महाराज पालखीचे औंढा नागनाथ नगरीत भक्तिभावाने स्वागत

यावेळी हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या पांडुरंगासाठी गूळ-शेंगदाण्याचे लाडू बांधले. यावेळी भजनाचा तसेच भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विठू नामाच्या गजरात भाविकांनी एक लाडू माझ्या लाडक्या पांडुरंगासाठी या भावनेतून लाडू बांधले.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुर्गा माता मंदिर ते पाटीदार भवन या मार्गावर पायी दिंडी काढण्यात आली. यात शहरातील दहा भजनी मंडळाचा सहभागाने संपूर्ण परिसर विठुमय झाला होता. त्यानंतर पाटीदार भवन येथे विठुरायाच्या भजनात तल्लीन होऊन गूळ-शेंगदाण्याचे लाडू बांधले.

Ashadhi Ekadashi
'सियावर रामचंद्र की जय'चा शहरात जयघोष

यावेळी भाविकांना हातात ग्लोज व केसाला कॅप देण्यात येऊन स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. भगवान बाबा बालिका आश्रमातील मुले व मुली तसेच आश्रमाच्या संचालिका कविता वाघ उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपली सेवा दिली. तसेच त्यांनी केलेली विठूरायाची तसेच रुक्मिणी मातेची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. द्वादशी दिवशी वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी, भगर, आमटी व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. उपक्रमासाठी मनोज सुर्वे, जगन्नाथ गित व इतर मंडळी परिश्रम घेत आहे.

उपक्रमात विविध संघटनांचा सहभाग

या उपक्रमात शहरातील विविध समाज संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यात माहेश्वरी, मारवाडी मिडटाऊन, सिंधी समाज, राजस्थानी, पाटीदार अशा समाजाच्या भाविकांचा समावेश होता. उपक्रमात तयार केलेले लाडू आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना प्रसादरूपाने मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे सागण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news