

Lack of facilities impact on tourism development in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर पर्यटनाची राजधानी असूनही येथे म्हणावे तसे पर्यटन वाढले नाही. यासाठी येथील असुविधा जबाबदार आहेत. यात सुधारण्यासाठी आम्ही तयार असून, शासनाने आम्हाला योग्य ती मदत करावी, असा सूर गुरुवारी (दि.१०) रामा हॉटेल येथे पार पडलेल्या टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाच्या २६ व्या राष्ट्रीय परिषदेत उमटला.
टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाच्या २६ व्या राष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी इंडिया टुरिझमचे प्रादेशिक संचालक मोहम्मद फारुख, दुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नरेंद्रसिंह राठोड, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष रवी गोसाई, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक शरद येवले, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत, टूरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. सुभाष जाधव, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अजय सिंह, एटीडीएफचे अध्यक्ष जसवंतसिंह, उमेश जाधव, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांची उपस्थिती होती.
नरेंद्रसिंह राठोड यांनी या शहराची योग्य पद्धतीने मार्केटिंग होणे आवश्यक आहे. पर्यटन ही रायझिंग इंडस्ट्री असून, वेळीच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. तर रवी गोसाई यांनी टूरिस्ट गाईडशिवाय पर्यटकांची हाताळणी अशक्य आहे. गईड हे केवळ काम करीत नाही, तर भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगितले.