परसोडा रेल्वेस्थानकावर सुविधांची वानवा

कोरोनापूर्वी थांबा असलेल्या रेल्वे सुरू करा, जनसंवाद कार्यक्रमात सात गावांतील नागरिकांची मागणी
sambhajinagar news
परसोडा रेल्वेस्थानकावर सुविधांची वानवाfile photo
Published on: 
Updated on: 

Lack of facilities at Parsoda railway station

परसोडा, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-नांदेड रेल्वेमार्गावरील परसोडा रेल्वेस्थानक विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. स्थानकाच्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासह कोरोना काळापूर्वी थांबा असलेल्या रेल्वेगाड्यांना पुन्हा थांबा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांसह सात गावांतील ग्रामपंचायतींचे प्रशासक, सरपंच व नागरिकांनी रेल्वेच्या नांदेड विभागाच्या विभागीय महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.

sambhajinagar news
Sambhajinagar News : चक्क बिल्डरसाठी 'सिंचनने' परस्पर विकली महसुलची जागा

रेल्वे विभागाच्या वतीने परसोडा रेल्वेस्थानकावर सकाळी ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाचे अधीक्षक प्रदीप कुमार शर्मा व परसोडा रेल्वेस्थानकाचे प्रमुख कुमार राजेशसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ग्रामपंचायतीचे प्रशासक श्याम राजपूत यांनी स्थानकावरील विविध असुविधांचा पाढा वाचत कोरोना काळापूर्वी परसोडा येथे थांबा असलेल्या मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस आणि पुणे-निजामाबाद या रेल्वेगाड्यांना पुन्हा थांबा देण्याची मागणी केली. या गाड्यांना थांबा मिळाल्यास विद्यार्थी, रोजगारासाठी बाहेरगावी जाणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

निजामकालीन स्थानकाची इमारत मोडकळीसमीटरगेज रेल्वे सुरू झाली, त्या काळात परसोडा रेल्वेस्थानकाची निजामकालीन इमारत उभारण्यात आली होती. मात्र, अनेक दशके उलटूनही या स्थानकाचा अपेक्षित विकास झालेला नाही. इमारत मोडकळीस आली असून, पावसाळ्यात छतामधून पाणी गळत असल्याने प्रवाशांना थांबण्यासाठीही गैरसोयीचा सामना करावा लागतो.

sambhajinagar news
Crime News : दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या बॅगेत गावठी कट्टा, तीन काडतुसे !

फलाटावरील फरशा जागोजागी फुटल्या असून, फलाटावर टाकण्यात आलेली सिमेंटची पत्रेही खराब झाली आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. या जनसंवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे प्रशासक श्याम राजपूत यांच्यासह सुदामसिंग छानवाल, नारायण कवडे, राजू कवडे, अनिल लोहाडे, रावसाहेब डुकरे, सुभाष महेर, डॉ. राजुभाऊ, नितीन पाटणी, सुभाष कवडे, सीताराम कवडे, बाळू कवडे, विशाल तारक, विजू छानवाल, पदम लोहाडे, कुंदन महेर, शेख अजीज, अशोक सोनवणे, शुभांगी साळवे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलाटाची उंची वाढविण्याची गरज फलाटाची असल्यामुळे उंची कमी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिलांना रेल्वेत चढताना व उतरताना अडचणी येतात. यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन फलाटाची उंची वाढविणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे.

परिसरातील गावांतील नागरिकांची गैरसोय

रेल्वे स्थानकावरील या समस्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परसोड्यासह बेंदवाडी, गोळवाडी, जम्मनवाडी, भिवगाव, बोरसर, कारखाना, संवदगाव आणि शिवराई परिसरातील प्रवासी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना या गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्थानकाची दुरुस्ती करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news