Chhatrapati Sambhajinagar road accident : ट्रकच्या धडकेत वडिलासह एक वर्षीय मुलाचा मृत्यू

नंद्राबाद गावाजवळ दुचाकीला धडक, पत्नी गंभीर
Chhatrapati Sambhajinagar road accident
खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर रोडवरील नंद्राबाद गावाजवळ झालेल्या अपघातातील आयशर ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी.pudhari photo
Published on
Updated on

खुलताबाद : खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर रोडवरील नंद्राबाद गावाजवळ बुधवारी (दि.१) दुपारच्या सुमारास आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किशोर सोमीनाथ सोनवणे (३१) व शिव किशोर सोनवणे (एक वर्ष) अशी मृतांची नावे आहे.

पूजा किशोर सोनवणे (२७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे कुटुंब मूळचे वरझडी फाटा (ता. गंगापूर) येथील रहिवासी असून, सध्या कागजीपुरा येथे वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होते. बुधवारी खुलताबाद येथील आठवडा बाजारासाठी तिघे दुकारीवरून निघाले होते.

Chhatrapati Sambhajinagar road accident
Chatrapati Sambhajinagar Accident : जीपची दुचाकीला धडक; निल्लोड येथील तरुण ठार

नंद्राबाद गावाजवळील वळ-णावर खुलताबादहून येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच २१-बीएच-४३३८) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात किशोर सोनवणे व त्यांचा एक वर्षाचा मुलगा शिव यांचा मृत्यू झाला, तर पत्नी पूजा या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar road accident
Chatrapati Sambhajinagar Accident : कारने दुभाजक ओलांडून रिक्षाला उडविले, तरुण ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news