

MP Kalyan Kale's brother was pushed, PA was beaten up
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा: पाल जि. प. गटातून काँग्रेसकडून वरुण पाथरीकर यांना उमेदवारी का दिली नाही. या कारणावरून काँग्रेसच्या पाथरीकर समर्थकांनी खासदार कल्याण काळे यांचे भावाला धक्काबुक्की तर पीएला बुधवारी मारहाण केल्याने शहरात खळबळ उडाली होती.
वरुण पाथरीकर यांना पाल गटातून निवडणुकीची तीन महिन्यांपासून तयारी केली होती. मात्र, पाल गटात पालचे ज्ञानेश्वर जाधव यांनी ऐन वेळेवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यातून हा राग अनावर झाला. कार्यकर्ते सरळ खासदार डॉ काळे यांच्या कार्यलायावर धडकून तेथे गोंधळ घातला.
मात्र, खा. काळे कार्यालयात नसल्याने सर्व कार्यकर्ते विश्वास औताडे यांच्या कार्यलायात येत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा खासदार डॉ. काळे यांच्या कार्यालयात येत तेथील खुर्चा व कूलरची तोडफोड केली. खासदार काळे यांचे बंधू भाऊ जगन्नाथ काळे यांना घेराव घातला धक्काबुक्की केली.
खा. काळे याचे पीए सदाशिव विटेकर हे मध्यस्थीसाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. जगन्नाथ काळे यांच्या वाहनावर लाथाचा मारा दिल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली होती.