कन्नड : तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना एप्रिल महिन्यामध्ये घडली होती. यानंतर चार महिन्यांनी शहर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने न्यायालयाच्या संशयित आरोपी विरुद्ध बुधवारी (दि.4) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. विकास नारायण सवई (रा. कनकावतीनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सवई एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केला होता. या प्रकरणी त्यावेळी पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल केली असता प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र परत मुलीस त्रास देण्यात येत असल्याने पीडितेच्या वडिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आदेश दिल्याने शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सपोनि कुणाल सूर्यवंशी,विजय चौधरी, अमोल गायकवाड करत आहे.