illegal soil mining : लंगडा तांडा शिवारात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

सुट्टीच्या दिवशी रान मोकळे; महसूल विभागाचे दुर्लक्ष
Illegal Mining
Illegal MiningPudhari
Published on
Updated on

कन्नड : तालुक्यातील लंगडा तांडा शिवारात सध्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननाने चांगलाच जोर धरला आहे. शासकीय सुटीचा फायदा घेत शेकडो ब्रास मातीचा उपसा केला जात असून, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे समोर येत आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाने सपशेल डोळेझाक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लंगडा तांडा शिवारातून हायवाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मातीची अवैध वाहतूक सुरू आहे. नियमानुसार माती, वाळू किंवा मुरूम उपसा करण्यासाठी परवानगी (रॉयल्टी) देताना उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र, येथे नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. किती ब्रासची रॉयल्टी देण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात किती उपसा केला जात आहे, याचे मोजमाप करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.

Illegal Mining
Revenue Department Recruitment | महसूल विभागाचा नवा आकृतीबंध मंजूर: राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर; प्रशासकीय यंत्रणा होणार बळकट

गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवणे बंधनकारक असताना, या भागातील बहुतांश वाहनांवर कोणतेही तांत्रिक उपकरण नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवार या शासकीय सुटीच्या दिवशी ही अवैध वाहतूक अधिक वेगाने केली जाते. महसूल विभागाचे अधिकारी जाणीव पूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

क्रीडा स्पर्धेचा अवैध फायदा?

सध्या परभणी येथे महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा सुरू असून, कन्नड येथील बहुतांश अधिकारी व कर्मचारी या स्पर्धेसाठी गेले आहेत. याच संधीचा फायदा घेत वाळू व माती माफियांनी उत्खननाचा सपाटा लावल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

Illegal Mining
पीडब्ल्यूडीचा क्यूआर घोटाळा २ हजार कोटींचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news