Sambhajinagar heatwave : 42 अंश तापमानात खरिपपूर्व मशागतीसाठी बळीराजाची कसरत

कन्नड तालुक्यात बाजारपेठेत शुकशुकाट, मजूर टंचाई; कूलर-पंख्यांच्या मागणीत वाढ
Sambhajinagar heatwave
रखरखत्या उन्हात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करताना शेतकरी.pudhari photo
Published on
Updated on

कन्नड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा तीव झाला असून तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्ते, चौक आणि बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचंड उकाड्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खरीप हंगामाची चाहूल लागल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागले आहेत. मात्र, तीव उन्हामुळे शेतीची कामे करणे कठीण होत असून अनेक ठिकाणी मशागतीच्या कामाला बेक लागल्याचे दिसून येत आहे. तरीही येणाऱ्या पावसाळ्याच्या तयारीसाठी बळीराजा कडक उन्हातही शेतात घाम गाळताना दिसत आहे. नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती आदी कामांसाठी शेतकरी प्रयत्नशील असले तरी तापमानाचा वाढता पारा मोठे आहवान ठरत आहे.

Sambhajinagar heatwave
Pune Heatwave Impact: पुण्यात 40 अंशांचा कहर! पाणीसाठे आटले, बाजारपेठा ओस

उन्हाच्या तीव झळांमुळे शेतीमजुरांची टंचाई निर्माण झाली असून अनेक मजूर दुपारच्या वेळेत कामावर जाणे टाळत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेतच काही प्रमाणात शेतीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेती मशागतीची कामे संथ गतीने सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

दुसरीकडे, उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे तालुक्यातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने व्यापारी वर्गालाही फटका बसत आहे. अनेक दुकानांमध्ये ग््रााहकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Sambhajinagar heatwave
Extreme heat business impact : बाजारातील रस्ते झाले निर्मनुष्य

दरम्यान, वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कूलर, पंखे, एअर कूलर तसेच थंड पेयांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये कूलर व पंख्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच उसाचा रस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, शीतपेये यांना देखील मागणी वाढली आहे.

उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला

वैद्यकीय तज्ज्ञांकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा तसेच उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आगामी काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news