Extreme heat business impact : बाजारातील रस्ते झाले निर्मनुष्य

पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारातील चित्र
Extreme heat business impact
पिंपळगाव रेणुकाई ः येथील आठवाडी बाजाराच्या दिवशी रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून येत आहे.pudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावर यंदा उन्हाच्या तीव्र झळांचा परिणाम दिसून आला. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने दुपारी 12 ते 4 या वेळेत बाजारातील मुख्य रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाले होते.

सकाळी 10 वाजेपर्यंत बाजारात लगबग दिसली, मात्र ऊन तापल्यानंतर ग्राहक व विक्रेते दोघांनीही माघार घेतली. भाजीपाला, फळे व कपड्यांचे विक्रेते ताडपत्री व ओल्या पोत्यांच्या सावलीत बसले दिसले. उन्हाच्या चटक्यामुळे भाजीपाला सुकून जात असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Extreme heat business impact
Pune Heatwave Impact: पुण्यात 40 अंशांचा कहर! पाणीसाठे आटले, बाजारपेठा ओस

“सकाळी आणलेला भाजीपाला दुपारपर्यंत सुकतो, त्यामुळे निम्म्या किमतीत विकावा लागतो ग्राहकांनीही सकाळीच खरेदीला पसंती दिल्याने दुपारचा बाजार पूर्णपणे थंडावला होता. उष्माघाताच्या भीतीने वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिल्याने मंगळवारचा बाजार असाच थंड राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Extreme heat business impact
चिकलठाणा, जाफरगेटचा आठवडी बाजार होणार बंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news