Sambhajinagar News : दहावी निकालाच्या काही तासापूर्वीच विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले

त्याने आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दहावी निकालाच्या काही तासापूर्वीच विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

Just hours before the Class 10 results were declared, a student ended his life by hanging himself.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या निकाल जाहीर होण्यास काही तास उरलेले असतानाच एका १५ वर्षीय विद्याथ्यनि राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पुंडलिकनगर भागात शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आली. सोहम ज्ञानेश्वर मोरे (१५ वर्षे ११ महिने, रा. पुंडलिक नगर, गल्ली नंबर १०, मूळ रा. वडोद खुर्द, ता. खुलताबाद) असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी रात्री त्याने आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

Sambhajinagar News
Dharur News : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने जीवन संपवले

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी त्याचा निकाल होता. सोहमचे वडील राज्य परिवहन महामंडळात (एसटी) मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत, तर त्याची आई एका मेसमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावते. दहावीची परीक्षा संपल्यानंतर सोहम पुण्याला त्याच्या काकांकडे गेला होता.

गुरुवारी सायंकाळी तो पुण्याहून शहरात परतला होता. रात्री त्याने सर्व मित्रांची भेट घेतली. त्याने मामालासुद्धा कॉल केला पण लागला नाही. त्यानंतर त्याने स्वतःचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime : पुंडलिकनगर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आईला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडले आणि घरी परतल्यावर एकट्याच असताना किचनमध्ये गळफास घेतला. त्याला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

४२ टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण

सोहमच्या आत्महत्येनंतर शुक्रवारी दुपारी दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याच्या मित्रांनी ऑनलाइन निकाल तपासला असता, सोहमला परीक्षेत ४२ टक्के गुण मिळाल्याचे समोर आले. सोहम याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news