

Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापिका सुमनांजली बनसोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जीव वाचविण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस तब्बल दोन किलोमीटर मागे घेण्यात आली; मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
नागरसोल ते तारूर रेल्वेस्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुमनांजली गेणूजी बनसोडे या मुंबईत भावाला राखी बांधून छत्रपती संभाजीनगरकडे परतत होत्या. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर वॉशबेसिनमध्ये हात धूत असताना रेल्वेला अचानक जोराचा झटका बसला. त्यामुळे तोल जाऊन त्या धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्या गेल्या. प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि जखमी महिलेच्या मदतीला धाव घेतली.
ट्रेन मॅनेजरने नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर रेल्वे दोन किलोमीटर मागे नेण्यात आली. त्यानंतर त्यांना रेल्वेतून छत्रपती संभाजीनगरकडे आणण्यात आले. पुढे घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
एसटीने तिकीट व्यवस्थेत टप्पा गाठत आधुनिकतेचा एनसीएमसी तिकीटप्रणाली लागू केली; मात्र या व्यवस्थेला तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसला आहे. स्मार्ट कार्डमध्ये टॉप-अप केल्यानंतरही रक्कम अपडेट न होणे, बॅलेन्स शून्य दाखवणे व इतर तक्रारी वाढल्याने एसटीला पुन्हा कागदी तिकिटांचा वापर करण्याचे आदेश एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी (दि. २) देण्यात आले.
वाहकांना महिला व ज्येष्ठांना कागदी तिकीट तर पूर्ण तिकीटधारकांना मशीनमधून तिकीट द्यावे लागत आहे. यामुळे मशीनसोबत कागदी तिकिटांचा ट्रेही सोबत ठेवने बंधनकारक आहे. सवलतधारकांना १४ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीने तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या सवलतधारकाना ३० सप्टेंबरपर्यंत NCMC पावती पाहून सवलतीचे तिकीट मिळणार आहे.