Sambhajinagar News : नियमबाह्य दस्त नोंदणी फुलंब्रीतही; कारवाई सोयगावच्याच अधिकाऱ्यांवर

रजिस्ट्री विभागाचा अजब कारभार, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती दडवली
Sambhajinagar News
Sambhajinagar News : नियमबाह्य दस्त नोंदणी फुलंब्रीतही; कारवाई सोयगावच्याच अधिकाऱ्यांवरfile photo
Published on
Updated on

Irregular document registration fulambri; Action against Soygaon officials

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नियोजन प्राधिकरणाची मंजूरी नसताना अनधिकृत घोषणा पत्रांच्या आधारावर नियमबाह्यरीत्या रजिस्ट्री केल्या जात आहेत. यातील सहजापूरच्या गट नंबर ६५ प्रकरणात नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दोन महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मालमत्ता कर थकबाकीदारांना मनपाचा दणका

त्यापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांच्याच प्रस्तावावरून नियमबाह्य दस्त नोंदणी प्रकरणात सोयगावचे प्रभारी सह दुय्यम निबंधक दीपक रावळकर यांना नोंदणी महानिरीक्षकांनी निलंबित केले. परंतु, सहाजापूरच्या त्या वादग्रस्त दस्तची नोंद घेणाऱ्या फुलंब्रीच्या सह दुय्यम निबंधकांना यात अभय का, असा सवाल उपस्थिती होत आहे.

जिल्ह्यात नियोजन प्राधिकारणाच्या मंजुरीविना अनधिकृत घोषणापत्रांच्या आधारे रजिस्ट्री झालेल्या दस्तांचा फेर सातबारामध्ये घेण्याचा सपाटा सुरू आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे. त्यासोबतच तुकडे बंदीच्या आदेशांचेही अवमान होत आहे.

या प्रकारांना तातडीने ब्रेक लागावा, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी अशी नोंद घेतल्या प्रकरणी गेल्या आठवड्यात पंढरपूरच्या मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के व तलाठी सायली विटेकर या दोन महिला महसुल अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांनी अनधिकृत घोषणा पत्राच्या आधारे सहजापूरच्या गट नंबर ६५ मधील दस्तची सातबारामध्ये नोंद घेतली होती.

तसेच अशा दस्तची रजिस्ट्री करणे देखील नियमबाह्य आहे. असे असतांनाही रजिस्ट्री कार्यालयाकडून तपासणीविनाच सर्रासपणे बेकायदेशीर तुकड्यांची नोंदणी केली जात आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी गौडा यांनी गेल्या आठवड्यात रजिस्ट्री कार्यालयाच्या कामकाजाची झाडाझडती घेतली.

Sambhajinagar News
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज

त्यात दरम्यान, या झाडाझडतीत अधिकाऱ्यांनी सोयगावमधील चुकीच्या दस्त नोंदणीची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. परंतु, तसाच प्रकार फुलंब्रीच्या नोंदणी कार्यालयात घडला. त्याबाबत माहिती दडविण्यात आली. अनधिकृत घोषणापत्राच्या आधारे फेर घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी गौडा यांनी कारवाई करुन दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. परंतु, त्यानंतरही रजिस्ट्री कार्यालयाच्या अधिकार्यांनी सहजापूरचा तो दस्त सोयगावला नव्हे तर फुलंब्रीतील रजिस्ट्री कार्यालयात नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना दिली नाही.

उलट जिल्हाधिकारी गौडा यांच्या सूचनांवरून अहवाल तयार करुन तो कारवाईसाठी पुण्याला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना पाठविला. त्यावरून सोयगावचे प्रभारी सह दुय्यम निबंधक रावळकर यांना निलंबित करण्यात आले. तर फुलंब्रीच्या सह दुय्यम निबंधकांना सपशेल बाजूला केले.

जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल

जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी नुकताच घेतला. त्यानंतर खासदार संदीपान भुमरे यांनीही आढावा घेत कामकाजावर नाराजी व्यक्त केली. त्यावरून जिल्हाधिकारी गौडा यांनी सोयगाव आणि सहजापूरच्या गट नंबर ६५ च्या चुकीच्या दस्त नोंदणी व फेरफारबाबत चौकशीचे आदेश दिले. मात्र, यात नोंदणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करीत सहजापूरचा दस्त फुलंब्री नव्हे तर सोयगावमध्ये नोंदविल्या गेल्याचे अहवालात नमूद केल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news