

छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज वरील पुलाचा स्लॅब पडल्यामुळे कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. मागील अडीच वर्षात तीन वेळा महामार्गाला तडे गेले असल्याचे समोर आले आहे.
अडीच वर्षांत ३ वेळा महामार्गावरील सरफेस, पूल, एक्सपान्शन जॉइंटच्या कामाच्या दुरुस्तीमुळे कामाचा दर्जा राखण्यात सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.