Skin Problems : सूर्याच्या अतिनील किरणांचा त्वचेवर वाढता धोका

तज्ज्ञ म्हणतात, सनस्क्रीन फक्त सौदर्यासाठी नाही, त्वचेच्या आरोग्यासाठीही आवश्यक
Skin Problems
Skin Problems : सूर्याच्या अतिनील किरणांचा त्वचेवर वाढता धोकाfile photo
Published on
Updated on

Increased risk of sun's ultraviolet rays to the skin

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

दरवर्षी उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या वाढतात. विशेषतः उन्हामध्ये असणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट ए (यूव्हीए) आणि अल्ट्राव्हायोलेट बी (यूव्हीबी) या अतिनील किरणांचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी सांगितले. सनस्क्रीन फक्त सौंदर्यासाठी नाही, त्वचेच्या आरोग्यासाठीही आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले.

Skin Problems
Zombie drug danger | झोम्बी ड्रगचा धोकादायक विळखा

उन्हातील अल्ट्राव्हायोलेट ए किरणांमुळे त्वचेचे अकाली वार्धक्य वाढते. त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, चेहऱ्यावरील चमक कमी होणे, त्वचेवर डाग पडणे अशा समस्या दिसतात. यालाच फोटो एजिंग असे म्हणतात. अल्ट्राव्हायोलेट बी किरणांमुळे सनबर्न, त्वचा लाल होणे, जळजळ, खाज, काळवंडणे अशा समस्या निर्माण होतात, असेही डॉ. टाकळकर म्हणाल्या.

काही व्यक्तींमध्ये फोटो डर्माटायटीस किंवा सूर्यप्रकाशामुळे होणारी अॅलर्जीही दिसून येते. दीर्घकाळ, सतत आणि तीव्र उन्हाचा संपर्क आल्यास त्वचेच्या पेशींमध्ये बदल होऊ शकतात. सतत सूर्यप्रकाशामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये शेतकरी, वाहतूक पोलिस, कामगार, विक्रेते, खेळाडू यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Skin Problems
Fungal infection | बुरशीजन्य संसर्ग ‘झाकू’ नका!

त्वचेची काळजी ही फक्त सौंदर्यासाठी नसून आरोग्यासाठीही आवश्यक आहे. योग्य कपडे, योग्य सनस्क्रीन आणि योग्य जीवनशैली यामुळे उन्हाळ्यातील अनेक त्वचारोग सहज टाळता येऊ शकतात, असा सल्लाही डॉ. आसावरी टाकळकर यांनी दिला.

अशी घ्यावी काळजी

सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हामध्ये जाणे टाळावे. उन्हात बाहेर पडताना मोठी टोपी, मोठा रुमाल, स्कार्फ, सनग्लासेस यांचा वापर करावा. फुल बाह्यांचे सैलसर सूती कपडे वापरावेत. महिलांनी जाड कापडाचे सनकोट किंवा पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरणे हितकारक ठरते.

त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक सनस्क्रीन अनेक लोक फक्त चेहऱ्यावर लावतात. प्रत्यक्षात मान, कान, हात, पाय आणि सूर्यप्रकाशाला उघडे राहणारे सर्व भाग यावर सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. उन्हात बाहेर पडण्याच्या २० ते ३० मिनिटे आधी पुरेशा प्रमाणात सनस्क्रीन लावावे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसातून किमान १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यासारखे द्रवपदार्थ उपयोगी ठरतात.

त्वचारोग रुग्णांच्या प्रमाणात वाढ लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असणाऱ्या डॉ. आसावरी टाकळकर, डॉ. अनुपम टाकळकर व्यक्तींनी उन्हाळ्यात अधिक काळजी घ्यावी. काही व्यक्तींमध्ये उन्हामुळे त्वचेवर लालसर पुरळ, खाज, छोटे फोड किंवा जळजळ निर्माण होते. सध्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला पॉलिमॉर्फिक लाईट इरप्शन या सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या त्वचारोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.
-डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोग तज्ज्ञ तथा राज्य सचिव, आयएमए.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news