Chhatrapati Sambhajinagar News : कुत्र्यांच्या चाव्यामुळे १० वर्षांत ५९ जणांचा मृत्यू

कुत्र्यांचा हल्ला
कुत्र्यांचा हल्ला
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  शहरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मागील महिनाभरात शहराच्या विविध भागांत २४ जणांवर कुत्र्याने हल्ले केले आहेत. त्यांत सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून त्याच्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जात आहे. परंतु, असे असतानाही कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, कुर्त्यांनी चावा घेतल्यामुळे दहा वर्षांत ५९ जणांचा मृत्यू झाला.

शहराच्या विविध भागांत सध्या मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये कुत्र्यांचे झुंडच्या झुंड उभे असल्याचे दिसून येते. ही संख्या दरवर्षी वाढतच आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार ४ वर्षांपूर्वी शहरात ४० हजारांच्या जवळपास मोकाट कुत्र्त्यांची संख्या होती. आजघडीला ती ५० हजारांवर गेली आहे. कुत्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी मनपाने २०२१ साली निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. यात भूम येथील अरिहंत वेल्फेअर सोसायटीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना २०२१ ते २०२४ असे ४ वर्षांसाठी शस्त्रक्रियेचे काम देण्यात आले होते. या एजन्सीला १ वर्षात ७ हजार मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी एजन्सीला मनपाकडून ५० लाख रुपये देण्यात येणार होते.

या एजन्सीने २ वर्षांत १४ हजार कुत्यांवर शस्त्रक्रिया करणे अपेक्षित होते मात्र, हे टार्गेट संबंधित एजन्सीला पूर्ण करण्यात अपयश आले आहे. दरम्यान, एजन्सीच्या या अपयशामुळे शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी शहराच्या प्रत्येक वसाहतीमध्ये सध्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच शहरातील आविष्कार कॉलनी भागात पिसाळलेल्या कुत्र्याने ८ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यात ६ चिमुकल्यांचा समावेश होता. त्यापूर्वी त्रिमूर्ती चौक परिसरात अशाच प्रकारे मोकाट कुत्र्याने ७ चिमुकल्यांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच या . हल्ल्याअगोदर किले अर्क भागात एक वृद्धेवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. महिनाभरात सुमारे २४ जणांवर कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती • यंत्रणेकडून देण्यात आली आहे

आधी होप, नंतर अरिहंत

मनपा प्रशासनाने २०१८-१९ साली मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी होप एजन्सीला काम दिले होते. मात्र, या एजन्सीला दररोज २० कुल्यांवरच शस्त्रक्रिया करण्यात यश येत होते. शस्त्रक्रियांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी मनपाने नव्याने निविदा प्रक्रिया केली. त्यात भूम येथील अरिहंत वेल्फेअर एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांनाही संख्या रोखण्यात अपयश आले आहे.

संख्या रोखण्यासाठी अभ्यास

निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करूनही शहरातील मोकाट कुत्यांची वाढती संख्या रोखण्यात यश आ- लेले नाही. त्यामुळे आता कृत्यांची वाढती संख्या कशी रोखावी, यावर अभ्यास करण्यासाठी मनपा प्रशासन एका स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्याच्या तयारीत आहे. या एजन्सीमार्फतच मनपा कुत्र्त्यांची जनगणनादेखील करून घेणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news