Samruddhi Mahamarg illegal route : समृद्धी महामार्गावर 'चोरवाटे'चा खेळ ?; टोल चुकवून बिनधास्त वाहतूक

'दै. पुढारी पडताळणीत' धक्कादायक वास्तव; सुरक्षा व टोल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Samruddhi Mahamarg illegal route
समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ४९७ परिसरात टोल टाळण्यासाठी या चोर मार्गाचा काही वाहनधारक वापर करत आहेत.pudhari photo
Published on
Updated on

नितीन थोरात

वैजापूर : हजारो कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर टोल टाळण्यासाठी अनधिकृत 'चोरवाटे'चा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव 'पुढारी इन्व्हेस्टिगेशन'च्या ग्राउंड रिपोर्टमध्ये समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चॅनेज क्रमांक ४९७परिसरात काही वाहनचालक नियमितपणे या अनधिकृत मार्गाचा वापर करत असल्याचे पाहणीत आढळले.

'पुढारी'च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत मुंबईहून नागपूरच्या दिशेने येणारी काही वाहने या अनधिकृत मार्गान महामार्गाबाहेर पडताना दिसली. तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या काही वाहनचालकांनी सुरक्षेसाठी राखीव असलेल्या आपत्कालीन मिडियन यू-टर्नचा वापर करून या मार्गावर प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले.

Samruddhi Mahamarg illegal route
Pune Traffic Planning: देवेंद्रजी, पुण्याच्या वाहतुकीसाठी एवढे कराच...

या मार्गावरून सातत्याने वाहनांची ये-जा होत असल्याने हा प्रकार नियमितपणे सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिकृत प्रवेशमार्गाच्या शेजारीच तयार झालेल्या या अनधिकृत रस्त्यामुळे टोल महसुलाला फटका बसत असल्याची शक्यता असून, महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षेसाठी राखीव असलेल्या यंत्रणेचा गैरवापर होत असताना संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू आहे. या 'चोरवाटे'चा वापर केवळ टोल चुकविण्यासाठीच नव्हे, तर अवैध वाळू वाहतूक, गुटखा तस्करी किंवा गुन्हे करून पसार होण्यासाठीही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून अनधिकृत मार्ग तातडीने बंद करावा, तसेच जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Samruddhi Mahamarg illegal route
Nashik news : वणी-मुळाणे मार्गावर 'मृत्यूचा सापळा'; प्रशासनाचा निष्काळजीपणा, ग्रामस्थांचा संताप अनावर

गुन्हेगारांसाठीही ठरू शकतो 'सुटकेचा मार्ग'?

टोल टाळण्यासाठी वापरला जाणारा हा अनधिकृत मार्ग केवळ महसूल बुडविण्यापुरता मर्यादित राहणार नाही, अशीही भीती व्यक्त होत आहे. या मार्गाचा वापर अवैध वाळू वाहतूक, गुटखा तस्करी तसेच चोरी किंवा इतर गुन्हे करून पोलिसांची नजर चुकवत पसार होण्यासाठीही होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या मार्गाची तातडीने दखल घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news