Police raid illegal gas refilling : टँकरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस भरणारी टोळी गजाआड

राज्यस्तरीय दक्षता पथकाची वाळूज परिसरात धडक कारवाई
Police raid illegal gas refilling
मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ मुंबईच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा मारून टँकरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याऱ्याचा पर्दाफाश केला.pudhari photo
Published on
Updated on

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावर उभ्या असलेल्या महाकाय गॅस टँकरचे सील तोडून थेट पाईपद्वारे व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा अत्यंत धोकादायक आणि जीव-घेणा काळाबाजार उघडकीस आला आहे. खोजेवाडी फाट्याजवळील एका हॉटेलमागे सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर मुंबईच्या अन्न पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने गुरुवारी (दि.२) मध्यरात्री छापा मारला. थेट टँकरमधून गॅस चोरी करताना दोन चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईत दोन गॅस भरलेली टँकर, १९.२ किलोचे १७भरलेली व ६ रिकामे व्यावसायिक सिलिंडर तसेच ५ किलो वजनाचे २ व १४.२ किलोचा १ असे २६ सिलिंडर, नोजल, पाईप असा जवळपास १ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालक मिराज मोहम्मद जैश (३५, रा. उत्तर प्रदेश, ह. मु. टिटवाळा, मुंबई) व श्रीकृष्ण सखाराम दहिफळे (२९, रा. सावरगाव कडा, ता. परळी, जि. बीड), हॉटेल चालक महेश विष्णू थोरात (रा. आंबेगाव) आणि टँकर मालक श्रीहर छेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मिराज जैश व कृष्णा दहिफळे या दोघांना अटक केली आहे.

Police raid illegal gas refilling
LPG Shortage : टंचाईमुळे शहरातील नागरिक 'गॅस' वर

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिराज जैश व श्रीकृष्ण दहिफळे हे (एमएच ४३, सीके ५७४७) व (एमएच ४३, सीके-५९२१) या टँकरवर चालक आहेत. १ एप्रिल रोजी मुंबई येथून एलपीजी गॅस भरून दोघे टँकरमधील गॅस खाली करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा येथील एचपी कंपनीच्या प्लांटवर येत होते. दरम्यान, गुरुवारी रात्री चालकांनी दोन्ही टँकर मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ हॉटेल साई यशमागे उभे केले. याठिकाणी त्यांनी गॅस टँकरचे सील तोडून टँकरमधील गॅस नोजल व पाईपच्या सहाय्याने सिलिंडरमध्ये भरणे सुरू केले होते.

गॅसची वाहतूक करताना टैंकर चालक टँकरमधील गॅस सिलिंडरमध्ये भरून गॅसची चोरी करतात, अशी माहिती रेशनिंग नियंत्रक विभागाचे संचालक चंद्रकांत डांगे, उपनियंत्रक गणेश बेल्लाळे यांना मिळाली होती. यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या अन्न पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने एमआयडीसी वाळूज पोलिसांची मदत घेत गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास याठिकाणी छापा मारला. यावेळी पथकाला टैंकर चालक मिराज व कृष्णा हे त्यांच्या जवळील एचपी कंपनीच्या टँकर (एमएच ४३, सीके-५९२१) मधून नोजल व पाईपद्वारे धोकादायक पद्धतीने गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरताना दिसून आले.

पथकाने दोघांना जागीच पकडून टँकरची तपासणी केली असता दोन्ही टँकरमध्ये एजिस गॅस (एलपीजी) प्रायव्हेट लि, मुंबई या नावाचे चलन व ई-बिल आढळून आले. ही कारवाई सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हगरंगे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, चंद्रकांत कांबळे, राजीव भेले, रामराजे भोसले, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंबले, राहुल इंगळे, विकास नागदिवे, अरुण काते, दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, रवींद्र राठोड, हिदायत खान, ईफान पटेल, अमोल कासार, सागर सिंघल, रामेश्वर लोखंडे यांच्या पथकाने केली.

Police raid illegal gas refilling
Gas Cylinder : गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यात अपयश

१ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

यावेळी पथकाने १ कोटी ५ लाखांचे दोन टँकर, टँकरमधील २० लाख ४ हजार रुपये किमतीचा ३५ हजार २२९ किलोचा एलपीजी गॅस साठा, तसेच १९.२ किलोचे १७ भरलेली व ६ रिकामे व्यावसायिक सिलिंडर तसेच ५ किलो वजनाचे २ व १४.२ किलोचा १ असे २६ सिलिंडर, टँकरमधून गॅस काढण्यासाठी व सिलिंडर भरण्यासाठी वापरण्यात येणारे चार विशेष व्हॉल्व्हचे रबवी पाईप असा जवळपास १ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६०० रुपयांमध्ये भरून द्यायचे सिलिंडर

गॅस टैंकर चालक ज्यावेळी या महामार्गावरून जात असत, तेव्हा ते हॉटेल चालक महेश थोरात याला एका सिलिंडरमागे ६०० रुपये या दराने ५ ते ६ सिलिंडर थेट टँकरमधून भरून देत असत. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावर हा जीव-घेणा प्रकार बिनदिक्कत सुरू होता.

टंचाईचा फायदा, मालकाची साथ ?

सध्या बाजारात व्यावसायिक गॅसचा तुटवडा असल्याने या काळाबाजार करणाऱ्यांचे फावले होते. छाप्याच्या वेळी २५ व्यावसायीक व १ घरगुती सिलिंडर भरून दिले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, टँकरमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त गॅसची बाहेर विक्री करत असल्याची पूर्ण कल्पना टैंकर मालक श्रीहरी छेदी याला होती, अशी कबुली चालकाने पोलिसांना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news