Illegal gas refilling : भेंडाळा येथे अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश

सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला, ९१ गॅस टाक्या व टँकर जप्त
Illegal gas refilling
Illegal gas refilling : भेंडाळा येथे अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश File Photo
Published on
Updated on

Illegal gas refilling exposed in Bhendala

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात शनिवारी दुपारी अवैध गॅस रिफिलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा भांडाफोड झाला; मात्र त्यांना अडवण्यासाठी थेट हल्लाच घडवून आणण्यात आला. पोलिसांनी तब्बल ९१ कमर्शियल टाक्या आणि २८,००० लिटर क्षमतेचा एचपी कंपनीचा टँकर जप्त केला.

Illegal gas refilling
Sambhajinagar News : सायबर सुरक्षा, नेशनल इंटेलिजेंस ग्रिडचा प्रभावी वापर करा : आयजी वीरेंद्र मिश्र

सूत्राकडून माहितीनुसार, पुणे मिळालेल्या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते गंगेश्वर सोनवणे, विजय ऊर्फ बाबूराव कांबळे, भीमराव बरकडे, शिवाजी चव्हाण, सुरेखा गायकवाड, संगीता नानेकर, शन्नो शेख आणि हरियाली कौर हे पहाटे ६ वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना भेंडाळा कॅफेजवळ त्यांनी संशयास्पद हालचाल पाहिली.

महिला कार्यकर्त्यांनी चौकशीसाठी थांबून व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले असता तेथील कामगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड करत कार्यकर्त्यांनी महामार्गावर धाव घेतली. गाड्या थांबल्यामुळे हल्लेखोरांचा डाव फसला. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Illegal gas refilling
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात पुन्हा भर'पूर'

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ९१ व्यावसायिक गॅस टाक्या व एक एसपी गॅस भरलेला टँकर (क्र. केए-०१ एएच-०८२८) त्यावरील चालक परवेज जियाऊद्दीन शहा (वय ३३) रा. दाताला ता. जि. चंद्रपूर यास अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गंगापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंगसाठी टँकर आणणे, टाक्या ठेवणे, खुलेआम महामार्गालगत हा व्यवसाय सुरू ठेवणे हे सर्व स्थानिक प्रशासनाच्या नजरेतून कसे सुटले ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. गंगापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु फक्त छोटे कामगार तुरुंगात जाऊन थांबणार का, की यामागील मोठे मासे बाहेर काढले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

एलपीजी गॅस रिफिलिंग करताना सुरक्षा नियमांचे पालन होत नाही. गळती झाली, आग लागली तर संपूर्ण महामार्गावरील शेकडो लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. अशा निष्काळजी व्यवसायाने जनतेच्या सुरक्षेवर गदा येत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news