Hydro Ganja Seized : शिक्षित तरुणांकडून तब्बल २९ लाखांचा हायड्रो गांजा जप्त

गुन्हे शारवेने दोघांना ठोकल्या बेड्या, ८ जणांवर गुन्हा दारवल
Hydro Ganja Seized
Hydro Ganja Seized : शिक्षित तरुणांकडून तब्बल २९ लाखांचा हायड्रो गांजा जप्तfile photo
Published on
Updated on

Hydro ganja worth 29 lakhs seized from educated youth

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील उच्चभू आणि सुशिक्षित घरातील तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात किती खोलवर अडकले आहेत, याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बाबा पेट्रोल पंप परिसरात सापळा रचून दोन उच्चशिक्षित तरुणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून चक्क २८ लाख ५० हजार रुपये किमतीचा २८५ ग्रॅम हायड्रोपोनिक (हायब्रीड) गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत प्रतिग्रॅम तब्बल १० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

Hydro Ganja Seized
Dharashiv News : गडकोट विकास महामंडळासाठी धाराशिवला आत्मदहनाचा प्रयत्न

ओम रवींद्र शिंदे (२३, रा. एन-४, सिडको) आणि राजवीर चरणसिंग बिराग (२०, रा. एन-४, सिडको) अशी अटकेतील आर-राजवीर बिरग ोपींची नावे आहेत. ओम हा एमबीए पदवीधर आहे, तर राजवीर संगणक अभियंता आहे. विशेष म्हणजे, दोघांच्याही कुटुंबाची पार्श्वभूमी कायद्याशी संबंधित असतानाही हे तरुण या काळ्या धंद्यात ओढले गेले आहेत.

Hydro Ganja Seized
MLA Satish Chavan : खासगी अनुदानित शाळांच्या वेतनेत्तर अनुदानाचा होणार पुनर्विचार

न्यायालयाने दोघांना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लोखंडी पुलाजवळ दुचाकीवरून (एमएच-२०-एचपी-३८८१) आलेल्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत २८५ ग्रॅम हायब्रीड गांजा, डिजिटल वजन काटा आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news