Chhatrapati Sambhajinagar crime : शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर कुख्यात राम बोडखेचा खुनीहल्ला

मी मजाक करत होतो म्हणत गळाभेट घेत मानेवर वार
Chhatrapati Sambhajinagar crime
अंबादास म्हस्के आणि राम बोडखेpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अण्णा, मी मजाक करत होतो, असे म्हणत आधी गळाभेट घेतली आणि नंतर अचानक कमरेचा चाकू काढून थेट मानेवर सपासप वार करत शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अंबादास आसाराम म्हस्के (५५, रा. पडेगाव) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही थरारक घटना रविवारी (दि. २४) मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप परिसरात घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार राम शेषराव बोडखे (रा. टीव्ही सेंटर) याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजेपासून आरोपी राम बोडखे हा अंबादास म्हस्के यांना वारंवार फोन करून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने शिवीगाळ करत होता. तुझ्यात हिंमत असेल तर मला बाबा पेट्रोल पंपावर भेटायला ये, असे आव्हान त्याने दिले. या आव्हानानंतर अंबादास आणि त्यांचा पुतण्या खंडू म्हस्के हे दोघे थार गाडीने महावीर चौकात पोहोचले. गाडीतून खाली उतरताच राम बोडखेने गळाभेट घेतली व आज तुझा मर्डरच करतो अशी धमकी देत त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले.

Chhatrapati Sambhajinagar crime
Thane Crime: कळव्यात भूमाफियाचा कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला; महिलेला भोसकले, तीन गंभीर

या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने ते गंभीर जखम झाले. पुतण्या खंडू म्हस्के याने तातडीने आरोपीला धक्का देऊन बाजूला केले आणि जखमी अंबादास यांना घार्ट रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खंडू म्हस्के यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल असून, पुढील तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.

राम बोडखेही जखमी

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबादास म्हस्के आणि राम बोडखे यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये राम बोडखे याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून, त्याचा पाय फॅक्चर झाल्याने तोही रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तर बोडखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar crime
पोलिस पुत्राच्या कुख्यात गँगचा निराला बाजार भागात राडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news