HUDCO monitoring water project : पाणीपुरवठा शहराच्या नवीन योजनेवर हुडकोचा वॉच

८२२ कोटींच्या कर्जवापराची स्वतंत्र पडताळणी
HUDCO monitoring water project
पाणीपुरवठा शहराच्या नवीन योजनेवर हुडकोचा वॉचpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाकडून २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवर कर्ज देणाऱ्या हुडकोकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून, कर्जरकमेचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे का याची स्वतंत्र पडताळणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर हुडकोच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१३) महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण प्रकल्पाची स्थळ पाहणी केली.

शहरासाठीच्या नव्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या योजनेत केंद्र शासन, राज्य शासन आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेत महापालिकेला ८२२ कोटी २२ लाख रुपयांचा हिस्सा द्यावयचा होता. मात्र, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने राज्य शासनाकडे विशेष अनुदानाची मागणी केली होती. त्यावरून शासनाने अनुदानाऐवजी दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला.

HUDCO monitoring water project
Bel Patra : शंकराला प्रिय असणारे बेलपत्र पूजेसोबत आरोग्याचाही आहे खजिना

त्यानुसार ते कर्ज हुडकोमार्फत मंजूर करण्यात आले. या कर्जाचा ८५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मागील महिन्यात महापालिकेला प्राप्त झाला. त्यानंतर सुमारे २२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला. आतापर्यंत एकूण १०७ कोटी रुपये महापालिकेला मिळाले असून, आणखी ८९ कोटी रुपयांच्या वितरणाची मागणी मनपाकडून करण्यात आली आहे. दरम्यान संपूर्ण कर्जरक्कम मनपाने अद्याप उचललेली नसली तरी हुडकोकडून प्रकल्पावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

HUDCO monitoring water project
Beed Armed Robbery : खळवट निमगावमध्ये सशस्त्र दरोडा

कामांची स्थळ पाहणी

अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान मुख्य पाइपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, उंच जलकुंभआणि पाणी साठवण टाक्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या प्रगतीसह निधीच्या वापरावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news