Sambhajinagar News : तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या एचआरच्या वडिलांसह भावाला बिहारमधून बेड्या

उस्मानपुरा पोलिसांची पश्चिम चंपारणमध्ये धडक कारवाई; मुख्य सूत्रधार अद्याप फरार
sambhajinagar crime news
तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या एचआरच्या वडिलांसह भावाला बिहारमधून बेड्याfile photo
Published on: 
Updated on: 

HR's father and brother who cheated 3 crores were arrested from Bihar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उस्मानपुरा परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत एचआर अधिकारी म्हणून कार्यरत असताना, अधिकाराचा गैरवापर करून कंपनीचे तब्बल २ कोटी ६८ लाख ८८ हजार ६८३ रुपये नातेवाईकांच्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानपुरा पोलिसांच्या विशेष पथकाने थेट बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात धडक कारवाई करत या बाप-लेकाच्या मुसक्या आवळल्या. दोघांनीही या आर्थिक गुन्ह्याची कबुली दिली असून, या कोट्यवधींच्या फसवणुकीचा मास्टरमाइंड नितीनकुमार गोपालसिंग मात्र अद्याप फरार आहे.

sambhajinagar crime news
Sambhajinagar News : चिकलठाण्यातील ५०९ प्लॉटधारकांची पालकमंत्र्यांकडे धाव

नितेश कुमार गोपाल सिंह (१८, भाऊ) आणि गोपाल सिंह जोगिंदर सिंह (५१, वडील, दोघे रा. नरहा पानापूर, ता. तेतरिया, जि. कारवाई करणारे पथक, खाली बसलेले दोन आरोपी. पश्चिम चंपारण, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली.

एन. आर. इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल प्रा. लि. या कंपनीत नितीनकुमार गोपालसिंग हा एचआर पदावर कार्यरत होता. त्याने १ नोव्हेंबर २०२३ ते २३ जून २०२६ या कालावधीत कंपनीच्या अंतर्गत व्यवहारांचा गैरफायदा घेतला. कंपनीच्या बँक खात्यातून परस्पर स्वतःच्या, भावाच्या, वडिलांच्या तसेच इतर नातेवाईकांच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने तब्बल पावणेतीन कोटी रुपये वळवून कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक केली.

हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीसह त्याचे कुटुंबीय पसार झाले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सायबर व तांत्रिक तपासावर भर दिला. संशयित आरोपी बिहारमधील मूळ गावी लपल्याची पक्की माहिती मिळताच, उपनिरीक्षक किरण बोराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तातडीने बिहारला रवाना झाले.

sambhajinagar crime news
Gangakhed : अकोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा

पथकाने पश्चिम चंपारण जिल्ह्यात सापळा रचून मुख्य संशयित नितीनकुमारचा शोध घेतला; मात्र तो चकवा देऊन पसार झाला. मात्र, त्याचा भाऊ नितेश आणि वडील गोपाल सिंह या दोघांना ताब्यात घेतले. कंपनीच्या पैशांच्या अपहारात आपला थेट सहभाग असल्याची कबुली दोघांनी दिली. मुख्य सूत्रधार नितीनकुमारचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपपायुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बोराडे, अंमलदार चव्हाण, कन्हाळे आणि अरविंद पुरी यांच्या विशेष पथकाने केली.

२१ खात्यांत पैसे अन्

नोव्हेंबर २०२३ ते जून २०२६ दरम्यान नियोजनबद्ध पद्धतीने हा पावणेतीन को केला. त्याने कंपनीच्या अकाऊंटंटला फॉर्म पाठवले, तसेच अधिकार असलेत दिशाभूल करून त्यांच्या सह्या व गोपन रक्कम परस्पर वळवली. संशय येऊ न रक्कम स्वतः सह भाऊ नितेश (२४ ला (१.९३ लाख), अमनकुमार (४१ लाखा लाख) अशा नातेवाईक व मित्रांच्या तुकड्या-तुकड्याने वळवली.

कंपनीचे अमोल पठाडे यांच्या हा प्रकार लक्षात ऑडिटमध्ये २ कोटी ६८ लाखांचा अप सुरुवातीला वडिलांनी ७ लाख १० हज तडजोडीचा बनाव रचला. मात्र नंतर त्या दरम्यान, ६ वर्षांचा सेवा करार धाब्याव नितीनकुमारने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण सव्र्व्हरवरील संपूर्ण डेटा डिलीट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news