

छत्रपती संभाजीनगर : किशोरवयीन मुलींना भविष्यातील आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूक केले जात आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. २६) सिडको एन-८ येथील मनपा रुग्णालयात शहरातील एका शाळेच्या २४ पात्र विद्यार्थिनींचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून, पात्र मुलींपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय ती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती मुख्य प्रशासकीय इमारत आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. एचपीव्ही लसीकरणाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे, तसेच किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा मोहिमेचा प्रमुख हेतू आहे. या उपक्रमातंर्गत रविवारी सिडकोतील एका शाळेच्या २४ विद्यार्थिनींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थिनी, त्यांचे पालक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासोबतच पात्र मुलींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, वयाची १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत, अशा पात्र मुलींनी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणाची प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी नागरिकांनी जवळच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. या लसीकरणामुळे किशोरवयीन मुलींना भविष्यातील आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी मदत होईल.