Sambhajinagar News : योजनेच्या लाभासाठी खोटी प्रकरणे सादर करणारे रुग्णालय रडारवर

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयकांचा इशारा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : योजनेच्या लाभासाठी खोटी प्रकरणे सादर करणारे रुग्णालय रडारवरfile photo
Published on
Updated on

Hospitals on radar for submitting false cases to benefit from scheme

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासकीय निधीचा अपहार करणारी, खोटी प्रकरणे सादर करणारी रुग्णालये आणि योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मोबदला मागणारे मध्यस्थ या प्रवृत्तीविरोधात जिल्हा कक्षाच्या सहाय्याने भरारी पथकाद्वारे आकस्मिक तपासणी व पडताळणी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद सोनार यांनी दिला.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar ZP : जि.प. आरोग्य विभागाचा उडाला बोजवारा !

कक्षाच्या माध्यमातून निरामय छत्रपती संभाजीनगर अभियानाला गती देण्यासाठी डॉ. स्वानंद सोनार यांनी शुक्रवारी (दि.२२) येथील प्रशासकीय अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सामाजिक सेवाभावी संस्था व संघटना प्रमुखांसोबत भेटी दिल्या तसेच योजना संलग्नित रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमवेत औद्योगिक समूहाकडून उपलब्ध होऊ शकणारा सीएसआर निधी आणि मराठवाड्यातील इतर छोट्या व मध्यम उद्योजकांच्या सहकार्याने विभागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासंदर्भात चर्चा केली. जिल्हा कक्षाने मागील चौदा महिन्यांत राबविलेल्या विविध आरोग्य उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गोरे, समाजसेवा अधीक्षक शामसुंदर वाकळे आणि वैद्यकीय समन्वयक गजानन कांबळे उपस्थित होते.

Sambhajinagar News
आयुक्तांकडून सर्व विभागांची झाडाझडती

स्थानिक आरोग्य समस्यांवर विशेष भर

जिल्ह्यात वाढत असलेले स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा व तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण तसेच सिकलसेल, अॅनिमिया आदी आजारांच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्या, आदिवासी पाडे, भटक्यांचे तांडे, असंघटित कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सोनार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news