

Holi at Kranti Chowk for the Public Safety Bill
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी सरकारने १० जुलै रोजी संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर केले. हे जनसुरक्षा बिल नसून, भाजपा सुरक्षा बिल असल्याचा आरोप करत आंबेडकरवादी संघटनांनी सोमवारी (दि.१४) या विधेयकाची होळी करत विरोध दर्शवत, आंबेडकरवादी संघटना सर्वच आघाड्यांवर लढा देणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या, महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांची बदनामी करणाऱ्या, जाती जातीत द्वेष पसरवून महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या सरकारने हे बिल आणले. हे बिल लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून तिची हत्या करणारे बिल आहे. दहशतवाद, नक्षलवाद आणि इतर देशविघातक शक्तींना आळा घालण्यासाठी देशात यूएपीए, एमपीडीएसह चार कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत या विधेयकाची होळी करत विरोध दर्शवला.
हे विधेयक रद्द करावे अन्यथा आंबेडकरी संघटनांनी विधेयकाच्या विरोधात सर्वच आघाड्यांवर लढणार, असा निर्वाणीचा इशारा दिला. याप्रसंगी दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, गौतम लांडगे, कृष्णा बनकर, विजय वाहुळ, पंकज बनसोडे, विशाल इंगळे, अरविंद कांबळे, राहुल साळवे, इंद्रकुमार जेवरीकर उपस्थिती होती.