

Hockey player Dhanraj Pillay visits the Sports Department
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला आंतरर राष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी शनिवारी (दि. २८) भेट दिली. यावेळी नव्याने तयार झालेल्या सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी धनराज पिल्ले यांचे स्वागत केले, यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. उदय डोंगरे, जिल्हा ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कुलगुरूंनी धनराज पिल्ले यांन विद्यापीठ क्रीडा विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमाच्या माहित दिली, चर्चेदरम्यान पिल्ले यांनी नव्याने तयार झालेल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरू होण्यापूर्वी भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाल्याची आठवण करून देत ट्रॅक पूर्ण झाल्यावर देखील त्यांना मैदानावर उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग लाभल्याने मानसिक समाधान झाल्याचे नमूद केले.
यावेळी क्रीडा विभागाचे डॉ. मसूद हाश्मी, डॉ. अभिजित दिक्खत, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, गणेश कड, रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार विलास भालेराव आदींचीही उपस्थित होती.