Ghati Hospital : घाटीत हायटेक इन-आउट सिस्टम

क्यूआर पास स्कॅन करून मिळणार इंट्री, सुविधेसाठी नियोजनचा दावा
Ghati Hospital
Ghati Hospital : घाटीत हायटेक इन-आउट सिस्टमfile photo
Published on
Updated on

High-tech In-Out System at Ghati Hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गरिबांच्या घाटी रुग्णालयात अत्याधुनिक उपचार सुविधांसोबतच आता विमानतळाप्रमाणे हायटेक इन-आउट सिस्टम सुरू करण्यात येत आहे. प्रवेश करण्यासाठी ओपीडीमधून क्यू आर पास मिळणार असून, हा पास स्कॅन केल्यानंतरच सर्जिकल इमारतीमधील विविध वॉर्डामध्ये जाता येणार आहे. रुग्ण, नातेवाइकांच्या सुविधासाठी हे नियोजन करत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Ghati Hospital
Digital Arrest Racket : ६१८ आदिवासींच्या नावाने २,४९५ सिम कार्ड; डिजिटल अरेस्ट रॅकेटमधील तिघांचा जामीन नाकारला

घाटी रुग्णालयात उपचारासाठी मराठवाड्यासह खान्देश, विदर्भातूनही हजारो रुग्ण येतात. दररोजची ओपीडी दोन हजारांवर गेली असून, तेवढेच रुग्ण उपचारासाठी विविध वॉर्डात दाखल असतात. त्यामुळे घाटीत २४ तास रुग्ण-नातेवाइकांची गर्दी असते. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक गर्दी ही एकट्या सर्जिकल इमारतीमध्ये दाखल रुग्णांसाठी असते. त्यामुळे अपघात विभाग तसेच आरएमओ समोरील प्रवेश गेटवर नेहमीच गर्दी होते.

ही गर्दी टाळण्यासाठी तसेच रुग्ण, नातेवाइकांच्या सुविधेसाठी क्यू आर कोड प्रवेश सिस्टम लागू करण्यात येत आहे. आरएमओ कार्यालयासमोरील सर्जिकल बिल्डिंग प्रवेशव्दाराला हायटेक इंट्री प्रमाणे लूक देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ओपीडीमधून मिळालेले क्यू आर पास स्कॅन करून प्रवेश मिळणार आहे.

Ghati Hospital
Gautala Sanctuary : बंदीत गौताळा अभयारण्यात पर्यटकांची वाढली वर्दळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news