Sambhajinagar News : ट्रक-पिकअपची समोरासमोर धडक

सिल्लोड : चिंचखेड्याजवळील घटना, जीवितहानी नाही
sillod news
ट्रक-पिकअपची समोरासमोर धडकfile photo
Published on
Updated on

Head-on collision between a truck and a pickup

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : ट्रक-बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि. २३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील चिंचखेड्याजवळी पूर्णा नदीजवळ घडला.

sillod news
Sambhajinagar News : महापालिकेचा 'स्वच्छतेची वारी-विठुरायाच्या' दारी उपक्रम

चालक शेख सलीम (४०), मोहम्मद मुदस्सर (४४, दोघे रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले. ट्रक (आरजे - ११, जीसी-४४८८) छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जात होता. तर या दरम्यान बोलेरो पिकअप (एमपी- ६८, जी- ०६२६) जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. पिकअप समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले.

sillod news
Accident News : आखतवाडा फाट्याजवळ धावत्या स्कॉर्पिओला आग

दरम्यान भवन-चिंचखेड्याजवळील पूर्णा नदीजवळ रस्त्याचे काम सुरु आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक एकाच मार्गाने सुरु असल्याने अपघात घडत आहे. शिवाय वाहतुकीचीही कोंडी होत आहे. तसेही या रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. हे काम कासवगतीने होत असून, अधूनमधून अपघात घडत आहेत. आठवडाभरात काम सुरू असलेल्या ठिकाणी हा तिसरा अपघात आहे. काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news