Harsul Lake : हर्सूल तलाव सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो, मनपाकडून १० वसाहतींना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसाने तलाव काठोकाठ
Harsul Lake
हर्सूल तलाव सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो, मनपाकडून १० वसाहतींना सतर्कतेचा इशारा File Photo
Published on
Updated on

Harsul Lake overflows for the third consecutive year, Municipal Corporation issues alert to 10 colonies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील १४ वसाहतींना पाणीपुरवठा करणारा हसूल तलाव सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तलाव काठोकाठ भरला असून, पहाटेपासून सांडव्यातून खामनदी पात्रात पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या दहा वसाहतींतील रहिवाशांना महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Harsul Lake
Waluj Mahanagar : वाळूज महानगर परिसरात मुसळधार पाऊस, पूल खचला

शहरातील पिण्याच्या पाण्याचे जून स्त्रोत म्हणून हसूल तलावाची ओळख आहे. पूर्वी या तलावातूनच संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून १९७२-७५ साली पैठणच्या जायकवाडी तलावातून शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

त्यानंतर पुन्हा दुसरी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र आजही हसूल तलावातून शहराच्या १४ वॉर्डाना पाणीपुरवठा केला जात आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता २८ फूट आहे. मागील वर्षी हसूल तलाव आऑगस्टमध्येच ओव् हरफ्लो झाला होता. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल चौथ्या महिन्यात हर्सल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

Harsul Lake
Gangapur Heavy Rain : गंगापूर तालुक्यात पूरस्थिती, गोदावरी, शिवना नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर

दोन आवठड्यांपूर्वी तलाव २२ फुटांवर होता. तर दोन दिवसांपूर्वीच तलावाची पाणीपातळी २६ फुटांवर होती. मात्र मुसळधार पावसाने तलाव पूर्णक्षमतेने भरून रविवारी पहाटेपासूनच ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. तलावाच्या सांडव्यातून पाणी खामनदी पात्रातून पाणी वाहू लागल्याने काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कचा इशारा दिला आहे.

नागरिकांची गर्दी

ओव्हरफ्लो झालेल्या हसूल तलावातील पाणी खाम नदीपात्रातून वाहू लागल्याने नागरिकांनी पाणी पहाण्यासाठी तलाव परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी मनपाने रक्षक तैनात केले आहेत.

मनपाकडून दवंडी

खामनदी पात्रातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून येत असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी लहान मुलांना नदीकडे जाण्यापासून मज्जाव करावा, अशी घोषणा भोंग्याद्वारे करण्यात आली. यावेळी झोन १ च्या सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news