

Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
हॉटेल विट्स खरेदी प्रकरणावर पडदा पडत नाही तोच, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आणखी एका जमीन घोटाळ्याचा आरोप होत आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेला प्लॉट आरक्षण रद्द बदलून शिरसाट यांनी मुलाच्या नावे २१ हजार चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला, असा आरोप एमआयएमचे प्रदे शाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यासोबतच या जागेत दारूची कंपनी टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रेल्वेस्टेशन येथील हॉटेल विट्स रेडीरेकनरच्या दरा-पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण अंगलट येताच पालकमंत्री संजय शिरसाट हे या खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडले. यानंतर त्यांनी आपले या प्रकरणात आता काही घेणेदेणे नाही, असे वक्तव्यही केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले हा तर असा प्रकार झाला की, लाच स्वीकारायची आणि पकडल्या गेल्यावर, पैसे परत करून म्हणायचे की, मी आता पैसे परत केले आहे. त्यामुळे आता या लाच प्रकरणाशी माझे काही देणेघेणे नाही, असे कसे तुमचे देणेघेणे मंत्री साहेब, असे जलील म्हणाले, हे प्रकरण अद्याप संपलेले नाही. यात चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंत्री शिरसाट यांनी असाच प्रकार एमआयडीसीच्या प्लॉट खरेदीमध्ये केला आहे.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी जे दोन प्लॉट राखीव होते. त्यातील एक २१ हजार २७५ चौरस मीटर आकाराचा प्लॉट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मंत्री संजय शिरसाट ऑगस्ट २०२४ मध्ये वितरित केला. या प्लॉटसाठी २०२२ पासून प्रक्रिया सुरू होती. उद्योगमंत्री उदय सामंत हेही यात सहभागी असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. कॅन्युओ डिस्टलरी प्रा. लि. नावाची कंपनी पार्टनरशिपमध्ये टाकण्यासाठी त्यांनी हा अर्ज केला होता. यात त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट, पत्नी विजया शिरसाट आणि भावेन अमीन नावाचे मोठे बिल्डर आहेत. प्लॉट वितरित झाल्यानंतर अमीन हे या पार्टनरशिपमधून बाहेर पडले, असेही माजी खासदार जलील म्हणाले. सध्या या कंपनीच्या पार्टनरशिपमध्ये मंत्री शिरसाट यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेच ते म्हणाले. दरम्यान, मंत्री शिरसाट यांनी असाच प्रकार एमआयडीसीच्या प्लॉट खरेदीमध्ये केला आहे.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी जे दोन प्लॉट राखीव होते. त्यातील एक २१ हजार २७५ चौरस मीटर आकाराचा प्लॉट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मंत्री संजय शिरसाट ऑगस्ट २०२४ मध्ये वितरित केला. या प्लॉटसाठी २०२२ पासून प्रक्रिया सुरू होती. उद्योगमंत्री उदय सामंत हेही यात सहभागी असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. कॅन्युओ डिस्टलरी प्रा. लि. नावाची कंपनी पार्टनरशिपमध्ये टाकण्यासाठी त्यांनी हा अर्ज केला होता. यात त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट, पत्नी विजया शिरसाट आणि भावेन अमीन नावाचे मोठे बिल्डर आहेत. प्लॉट वितरित झाल्यानंतर अमीन हे या पार्टनरशिपमधून बाहेर पडले, असेही माजी खासदार जलील म्हणाले. सध्या या कंपनीच्या पार्टनरशिपमध्ये मंत्री शिरसाट यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेच आहेत. त्यामुळ या सपूर्ण प्रकरणाचा आता सावाआयकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी सीबीआयला मेल करणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेवेळी राज्य भ्रष्टचारमुक्त करणार असल्याचा दावा केला होता. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय शिरसाट यांच्या हॉटेल खरेदीचे प्रकरण पुढे आल्यावरही त्यांना हे प्रकरण दिसले नाही. त्यांना आता एक नवा चष्माच बनवून देतो. या प्रकरणात काही कारवाई झाली नाही. तेव्हा एमआयडीसीतील प्लॉट खरेदीत ते काही कारवाई करतील, ही अपेक्षाच न केलेली बरी, असा खोचक टोलाही जलील यांनी फडणवीस यांना लगावला.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये कंपनी टाकण्यासाठी जो प्लॉट वितरित झाला, तो सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाला आहे. त्यामुळे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आर-पांवर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.
मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न २० लाख आहे. त्यांच्यावर अगोदरच १२ कोटींचे कर्जही आहे, असे असताना त्यांना कोट्यवधींचे कर्ज कसे मिळू शकते. तसेच त्यांनी १०५ कोटी ८९ लाख रुपये गुंतवणूक करून कॅन्युओ डिस्टलरी प्रा. लि. नावाची कंपनी टाकण्यासाठी स्वतःचे भाग भांडवल २५ कोटी रुपये दाखविले कसे, असा सवालही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.