Grishneshwar Temple : श्रावणातील घृष्णेश्वराचे दर्शन होणार सुकर

वाहतुकीसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन, विशेष नियमावली लागू
Grishneshwar Temple
Grishneshwar Templepudhari photo
Published on
Updated on

वेरूळ : श्रावण महिन्यात देशभरातून श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने दर्शन, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे, तसेच गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी व अनुचित प्रकार टाळता यावेत, यासाठी १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे.

व्हीआयपींसाठीही नियमांचे बंधन

श्रावणातील गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल स्वीकारला जाणार नाही. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दुपारी २ ते ४ या वेळेत दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व शिफारसपत्र तपासल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

Grishneshwar Temple
Vilas Ghule murder case : विलास घुले यांच्या पत्नीने प्राशन केले विष

चार टप्प्यांत नो व्हेईकल झोन

श्रावणातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेरूळमध्ये वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक या मार्गावर १४ ते १८ ऑगस्ट, २१ ते २५ ऑगस्ट, २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर आणि ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ राहणार आहे. या वेळेत या मार्गावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

भाविकांसाठी जनसंपर्क कक्ष

दर्शन, वाहतूक, पार्किंग तसेच इतर आवश्यक बाबींबाबत भाविकांना तातडीने माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी महसूल विभाग, पोलिस विभाग आणि देवस्थान विश्वस्त मंडळाच्या समन्वयातून विशेष जनसंपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे.

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

श्रावण मासात घृष्णेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. दर्शन व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस, महसूल विभाग तसेच मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

Grishneshwar Temple
Devendra Fadnavis : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

सुरक्षेवरही विशेष भर

श्रावण मासात मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस, महसूल विभाग आणि मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली जात आहे. गर्दीचे नियोजन, वाहनांची वाहतूक, पार्किंग व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news