Grishneshwar Development Plan-घृष्णेश्वर विकासासाठी २१० कोटींच्या आराखड्यास मान्यता

घृष्णेश्वर विकासासाठी २१० कोटींच्या आराखड्यास मान्यता
Mahashivratri 2025 - Grishneshwar Temple
वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर Pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यास वाढीव कामांसह दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देत राज्य शासनाने एकूण २१०.४५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी या विकास आराखड्यास सुरुवातीला ११२ कोटी, त्यानंतर १५६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आता नव्याने ५३.८२ कोटी रुपयांच्या वाढीव कामांचा समावेश करण्यात आल्याने एकूण आराखड्याची किंमत २१०.४५ कोटी रुपये झाली आहे.

Mahashivratri 2025 - Grishneshwar Temple
Jalna Yelahanka Special Train-जालना-येलहंका विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या बैठकीत दर्शनरांग व्यवस्था, क्लॉक रूम, भक्तनिवासातील अतिरिक्त खोल्या, फर्निचर, बाह्य वळण रस्ता, रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा आदी सुविधांचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकास आराखड्याच्या या कामांचा समावेश

वाढीव कामांमध्ये मंदिर परिसरातील तीन प्रवेशद्वारे, प्रशासकीय इमारत, दर्शनबारीवर छत, क्लॉक रूम, दगडी संरक्षण भिंत, लोखंडी ग्रील, दगडी पाथवे, वृक्षारोपण, भक्तनिवासासाठी अतिरिक्त निधी, लेणी क्रमांक १ ते महादेव मंदिर जोडणाऱ्या नव्या रस्त्याचे काम, सौर व एलईडी स्ट्रीट लाईट, पाणी साठवण टाक्या, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, आरओ फिल्टर, ठिबक सिंचन, घनकचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.

Mahashivratri 2025 - Grishneshwar Temple
Hazur Sahib Express Pune Extension |हुजूर साहिब-हडपसर एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सोडा

अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सर्व कामे गुणवत्तापूर्ण, कालबद्ध आणि संबंधित कायद्यांतील परवानग्या घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news