Crime News : आजी ओळखलं का..? म्हणत भामट्याने ५ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लुबाडल्या

बीड बायपास परिसरातील घटना
Crime News
Crime News : आजी ओळखलं का..? म्हणत भामट्याने ५ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लुबाडल्याfile photo
Published on
Updated on

"Grandma, do you recognize me?" — with these words, a fraudster swindled gold bangles weighing five tolas

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आजी तुम्ही मला ओळखले का? मी तुमच्या मुलाचा मित्र आहे... असे गोडगोड बोलून ओळख दाखवत एका भामट्याने ८५ वर्षीय वृद्धेला बोलण्यात गुंतवून तब्बल ५ तोळ्यांच्या चार सोन्याच्या बांगड्या लुबाडून नेल्या. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी ८ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोड परिसरात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime : तोतया पोलिसांनी खऱ्या पोलिसांना आणले जेरीस

फिर्यादी कमल विश्वनाथ पाटील (८५, रा. अरुणोदय कॉलनी, दत्तमंदिर, बीड बायपास) या त्यांच्या मुलासोबत राहतात. बुधवारी (दि. १३) सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या घरातून ज्वारी आणण्यासाठी पायी बीड बायपास रोडकडे निघाल्या होत्या. रस्ता ओलांडून रिक्षा एजन्सीजवळून पायी जात असताना, पाठीमागून एका दुचाकीवर एक भामटा आला.

त्याने आजींसमोर दुचाकी उभी करून त्यांना थांबवले. आजी तुम्ही मला ओळखलं का? मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. माझे दुकान इथेच समोर आहे. तुमच्या नावावर पैसे आलेले आहेत, अशी बतावणी करून त्यांच्या हातात पैसे दिले. पुन्हा फोनवर बोलत तेच पैसे परत घेत तुमच्या गळ्यातील सोन्याची सोनाराकडे पावती करून आणू, मग तुम्हाला पैसे देतो, माझ्यासोबत दुचाकीवर चला असे तो म्हणाला मात्र आजींनी त्याला स्पष्ट नकार देत मला त्यातले काही समजत नाही असे सांगितले.

Crime News
Mangalsutra snatched : सलग दोन दिवसांत दोन वृद्ध महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले; मुकुंदवाडी, चिकलठाणा हद्दीत घटना

गप्पा मारत हातचलाखी

आजीने नकार दिल्यानंतरही भामट्याने आजींसोबत गप्पा मारणे सुरूच ठेवले. त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या हातातील ५ तोळ्यांच्या सोन्याच्या ४ बांगड्या काढायला लावून पिशवीत ठेवण्यास सांगितले. वजन करून पावती घेऊन येतो, असे म्हणत बांगड्या असलेली पिशवी आजींकडून हिसकावून घेत त्याने दुचाकीवर पोबारा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news