Sambhajinagar News : देवाच्या जागेचे सर्वाधिक लाभार्थी सरकारी कर्मचारी

५ वर्षांपासून सुरू होती विक्री, पैसे परत मिळविण्यासाठी तगादा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : देवाच्या जागेचे सर्वाधिक लाभार्थी सरकारी कर्मचारीfile photo
Published on: 
Updated on: 

Government employees are the primary beneficiaries of land designated for religious purposes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: श्री राम मंदिर मठ बालाजी ट्रस्टच्या ४१ एकर जागेचा विक्री घोटाळा उघडकीस आल्यानंतर ट्रस्टींनी जाहीर प्रगटन देत हात वर केले आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून या जागेत प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यापार सुरू असून खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सरकारी कर्मचारी आणि व्यापारीच आहेत. त्यातील बहुतांश जणांनी आता पैसे परत मिळविण्यासाठी तगादा सुरू केला आहे.

Sambhajinagar News
Shri Balaji Ratha procession : आज सीमोल्लंघन, कर्णपुऱ्यात जय्यत तयारी

जाधववाडी मोंढालगतच्या श्री राम मंदिर मठ बालाजी ट्रस्टच्या ४१ एकर जागा डेव्हलपमेंटच्या नावाखाली परस्पर विक्री केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेनंतर या जागेतील प्लॉट ज्यांनी खरेदी केली. त्यासर्वांचेच आता धाबे दणाणले आहेत. अनेकांनी जागेसाठी १५ ते २० लाख रुपयांची बुकिंग रक्कम दिली आहे.

त्यात काहींनी थेट बँकेद्वारे तर काहींनी रोख आणि धनादेशाद्वारे ही रक्कम दिली आहे. यात बहुतांश प्रमाणात सरकारी कर्मचारी आहेत. त्यासोबतच गुंतवणुकीच्या दृष्टीने काही व्यापाऱ्यांनी देखील देवाची जागा खरेदी केली आहे. दरम्यान, आता जागा खरेदी करणाऱ्यांपैकी काहींनी पैसे परत मिळावेत, यासाठी थेट विक्रेत्यांकडे तगादा सुरू केला आहे.

परंतु, जो पैसे व्यवहारातून प्राप्त झाला. तो सर्वच जागेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि सपाटीकरणासह रस्ते, पथदिव्यांच्या कामावर खर्च करण्यात आल्याचे यापूर्वीच श्री रामानंद बिल्डर्स अॅण्ड डेव्हपर्सचे मुकुंद गंगाधर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता तगादा लावणाऱ्यांच्या पैशाचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेचे - पोलिस महसुली रेकॉर्ड मागविणार

विक्रेत्यांची धाव नेत्यांकडे

श्री राम मंदिर मठ बालाजी ट्रस्टच्या जागेत गुपचूप ६५० कोटींचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी घोटाळा उघड होताच आता शहरातील काही राजकीय नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, त्यातील बहुतांश जणांनी प्रकरण देवाच्या जमिनीशी संबंधित असल्याने मदतीस नकार दिल्याचे कळते.

चर्चा मंत्रालयस्तरावर तोडग्याची

देवाच्या जागेतील आम्ही खरेदी केलेला प्लॉट उशीर लागेल, पण आम्हालाच मिळेल, असा दृढ विश्वास काही प्लॉट धारकांतून व्यक्त करण्यात येत आहे. यात मंत्रालयस्तरावरून तोडगा काढण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे प्लॉटधारकांकडून ऐकावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news