Fraud Case : पाच लाखांचा माल सुरतमध्ये परस्पर विकला

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक; ट्रक मालक, चालक आणि व्यापाऱ्याचे संगनमत
 fraud case
fraud casefile photo
Published on
Updated on

Goods worth five lakhs sold off surreptitiously in Surat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातून सुरत (गुजरात) येथे पाठवलेला ५ लाख १८ हजार रुपयांचा प्लास्टिकचा माल (पेट बॉटल) नियोजित ठिकाणी न पोहोचवता, परस्पर दुसऱ्याच कंपनीला विकून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 fraud case
Urea Black Marketing Exposed | कुंभार पिंपळगावात युरियाचा काळाबाजार उघड

हा प्रकार २५ ते २७ जूनदरम्यान मराठवाडा वेस्टेज प्लास्टिक, होलसेल सेंटर, नारेगाव येथे घडला. याप्रकरणी ट्रक उपलब्ध करून देणारा अज्ञात व्यक्ती (मो. ७८६१०४३१३३), ट्रक मालक आकाश बाबूभाई मंद (रा. राजकोट, गुजरात), ट्रक चालक पूनम सिंग आणि व्यापारी मनीष जैन (रा. सुरत, गुजरात) या चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख मुस्तबीन शेख अन्वर (२८, रा. कौसर पार्क, नारेगाव) यांच्या तक्रारींनुसार, त्यांचा मेट्रो ट्रान्सपोर्ट नावाचा व्यवसाय आहे. त्यांनी २५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास 'मराठवाडा वेस्टेज प्लास्टिक होलसेल सेंटर', नारेगाव येथून ८,६१५ किलो वजनाचा प्लास्टिकचा माल एका ट्रकमध्ये (जीजे-०३-बीवाय-३६१५) भरून सुरत येथील 'निष्ठा ट्रेडिंग' कंपनीकडे पाठवला होता. या मालाची किंमत ५ लाख १८ हजार ४५० रुपये होती. हा माल पोहोचवण्यासाठी त्यांनी एका अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधून भाड्याने ट्रक घेतला होता.

 fraud case
Black-marketing : रेशनसह चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा काळाबाजार

२७ जून रोजी ट्रक चालकाचा मोबाईल बंद येऊ लागल्याने मुस्तबीन यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या पर्यायी चालकाच्या नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी चालकाने, सुरतमध्ये भेटलेल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून हा माल 'अलायन्स रेकोट प्रा. लि.' या दुसऱ्याच कंपनीत खाली केल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता, मनीष जैन (जय अंबे इंटरप्रायजेस) याने हा माल परस्पर उतरवून घेतल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक नंदकुमार लाटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news