Gold Silver Price Drop : तीन दिवसांत सोने दहा, तर चांदी बावीस हजारांनी घसरली

युद्ध, गॅस टंचाईचा परिणाम, मागणी घटल्याने सराफा बाजारावर संकट
Gold Silver Price Drop
Gold Silver Price DropPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे सातत्याने दर वाढून सोने-चांदीचे भाव विक्रमी उच्चाकांवर पोहोचले असताना आता याच कारणाने सोने-चांदीच्या दरात घसरणही सुरू आहे. तीन दिवसांत पिवर सोने प्रतितोळा १० हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचे भावही प्रतिकिलो मागे २२ हजार रुपयांनी खाली उतरले आहेत.

मध्यपूर्वेत भडकलेल्या युद्धामुळे आणि याच कारणामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने सराफा बाजारावरही थेट परिणाम जाणवत असल्याचे सोने-चांदीचे व्यापारी म्हणाले. युद्धामुळे आखाती देशात सोने-चांदीचा बाजार बंद पडला आहे. तर आपल्याकडेही सराफा बाजाराला युद्धाचा फटका बसला आहे.

Gold Silver Price Drop
Purna theft case : पूर्णेत जबरी चोरीतील ५ जण जेरबंद, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

गॅस टंचाईमुळे लग्नसराईवर विघ्न आल्याने शहरातही सोने चांदीची मागणी घटली आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ मार्च रोजी तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळा भाव असलेले सोने शुक्रवारी (दि.२०) रोजी १ लाख ५१ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आहे.

Gold Silver Price Drop
Dudhna river illegal sand mining : दुधना नदीत अवैध रेती उत्खनन; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोने-चांदी स्वस्त- युध्दामुळे आखाती देशातील सराफा बाजार बंद आहे. आपल्याकडेही युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण होऊन लग्नसराई पुढे ढकलल्या जात आहे. याचा परिणाम सराफा बाजारावर होत असून, तीन दिवसांत सोने १० तर, चांदी २२ हजारांनी स्वस्त झाली आहे.

नंदकुमार जालनावाला, गव्हर्मेंट अप्रुव्हल व्हॅल्युअर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news