Sambhajinagar News : शहरातील बेकायदा बांधकामांना नोटीस द्या

महापालिका प्रशासकांचे आदेश, वॉर्डनिहाय गुंठेवारीचे कॅम्प लावा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहरातील बेकायदा बांधकामांना नोटीस द्या File Photo
Published on
Updated on

Give notice to illegal constructions in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये बेकायदा बांधकामे सुरू आहेत. जो परवानगी न घेता बांधकाम करेल, त्याच्याविरोधात तातडीने कारवाई करा, त्यासोबतच बेकायदा बांधकामे शोधून त्यांना नोटीस द्या, असे आदेश गुरुवारी (दि.२८) महापालिकेच्या आढावा बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी सर्व १० झोन कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकणाऱ्या निर्दयी मातेला अटक

शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणारी बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी बेकायदा बांधकामांकडे वक्रदृष्टी केली आहे. परवानगी न घेता अनेक जण बांधकाम करतात. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडतो. बेकायदा बांधकाम करून मालमत्ताधारक महापालिकेच्या सर्व सेवांचा लाभ घेतात.

त्यामुळे आता अशा बेकायदा बांधकामांवर प्रत्येक झोन कार्यालयाने लक्ष ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रशासकांनी दिले. त्यासोबतच ज्या ज्या झोन कार्यालयाअंतर्गत येणार्या भागांमध्ये गुंठेवारी वसाहती आहेत, त्या वसाहतींतील बेकायदा बांधकामांचा शोध घेऊन नोटीस बजावणे आणि त्यांना गुंठेवारीनुसार मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी सूचना करणे, तसेच गुंठेवारी न केल्यास कारवाईचेही आदेश प्रशासकांनी या बैठकीत दिले आहेत. दरम्यान, शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये गुंठेवारीचे कॅम्प लावण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.

Sambhajinagar News
सावधान ! शहरात डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव

रस्त्यांचे होणार ईटीएस

शहर विकास आराखड्यातील मंजूर ३६, २४, १८ मीटरच्या सर्व रस्त्यांची यादी तयार करून या रस्त्यांचे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात यावा, असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. ज्या भागातील रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्व्हे होईल, त्याच भागात गुंठेवारीचे कॅम्प लावण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मनपाचे बँकांना पत्र

गुंठेवारीचे प्रमाणपत्र नसलेल्यांना बँकांनी कर्ज देऊ नये, यासाठी महापालिका शहरातील सर्व बँकांशी पत्रव्यवहार करणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news