

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वसंतराव नाईक चौकात जालन्याकडे जाणारा भरधाव गॅस टँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
अग्निशामक दल आणि पोलिसांनी वेळीच दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या रोडवरील वाहतूक थांबविली आहे. तसेच रामगिरी हॉटेल, कॅनॉट परिसर आणि एन ३, एन ४ सिडको या भागात कोणीही गॅस पेटवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस लिकेज थांबविण्यात चे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी दाखल होत या परिस्थितीची पाहणी केली. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साडेपाच तास लागतील, असे उपायुक्त बगाटे यांनी सांगितले.
हेही वाचा :