Garbage collection workers : कचरा संकलन कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह वैद्यकीय संरक्षणाचीही हमी

महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह वैद्यकीय संरक्षणाचीही हमी देण्यात आली आहे.
Garbage collection workers
Garbage collection workers : कचरा संकलन कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह वैद्यकीय संरक्षणाचीही हमीfile photo
Published on
Updated on

Garbage collection workers guaranteed medical protection along with minimum wages

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह वैद्यकीय संरक्षणाचीही हमी देण्यात आली असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा जाहीर करण्यात आल्या.

Garbage collection workers
Solid Waste Management Rules 2026 : कचरा वर्गीकरण सक्तीचे; ग्रा.पं. तींना आदेश

यानिमित्ताने शुक्रवारी (दि.१९) मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगारांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शवत या निर्णयाचे स्वागत केले. कामगारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मनपा प्रशासनातील अधिकारी तसेच कंपनीच्या प्रतिनिधींचा जाहीर सत्कार करण्यात आला.

महापालिकेच्या स्वच्छता विभागासाठी कार्यरत असलेल्या अर्बन वेस्ट हँडलिंग एलएलपी कंपनीतील कचरा संकलन कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभमिळाल्यानंतर आता स्वतंत्र वैद्यकीय सुविधेचीही हमी मिळाली आहे. या निर्णयामुळे हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला असून, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शुक्रवारी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शासकीय नियमानुसार २१ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसी योजनेचा लाभ मिळत नाही.

Garbage collection workers
Chhatrapati Sambhajinagar News : जलसंपदात कामाआधीच कंत्राटदार फायनल

किमान वेतन लागू झाल्यानंतर अनेक कामगारांचे वेतन या मर्यादपेक्षा अधिक वाढल्याने त्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू मिसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा मुद्दा मनपा आणि कंपनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

त्यांच्या या मागणीची दखल घेत कंपनीने ईएसआयसीच्या पर्याय म्हणून स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविषयक सेवांचा लाभ अखंडपणे मिळणार असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news