Illegal meat seizure : गंगापुरात पोलिसांचा छापा; २५० किलो गोमांस जप्त

५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Illegal meat seizure
गंगापूर येथील कुरेशी मोहल्ल्यातील छाप्यात जप्त करण्यात आलेले संशयित गोवंश मांस.pudhari photo
Published on
Updated on

गंगापूर : शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून विक्रीसाठी मांस साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळी छापा टाकला. या कारवाईत २५० किलो संशयित गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरलेले दोन धारदार सुरे असा ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता अतीक अय्युब कुरेशी (वय ३६, रा. कुरेशी मोहल्ला) यांच्या राहत्या घरालगतच्या मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. तेथे विक्रीसाठी ठेवलेले सुमारे २५० किलो संशयित गोवंश मांस (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) तसेच कत्तलीसाठी वापरण्यात आलेले दोन धारदार सुरे (किंमत ६०० रुपये) जप्त करण्यात आले.

Illegal meat seizure
Crime News : कन्नड पोलिसांचा अवैध गोवंश कत्तलखान्यावर मध्यरात्री छापा

या प्रकरणी पोलिस अंमलदार रमेश जारवाल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अतीक अय्युब कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सफौ डी. वाय. अवधूत यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ अमित पाटील करीत आहेत.

Illegal meat seizure
Chhatrapati Sambhajinagar Crime : गोवंश तस्करांच्या टोळीला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news